प्रवाशांचे होतात हाल : अनेक प्रवासी निवारे अतिक्रमणातवर्धा : प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीद घेतलेली एसटी गावागावांत आज धावत आहेत. त्यामुळे प्रवाश्यांसाठी वाहतुुकीचा पर्याय सोपा झाला आहे. पण बस थांबण्यासाठी नबविण्यात आलेले गावागावातील निवारे जीर्णावस्थेत दिसून येतात. अनेक ठिकाणी तर ते मोडकळीस येऊन धोक्याचे ठरत आहे. परिणामी हे भग्नावस्थेतील निवारे पाडून नव्याने बांधण्यात यावे अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. गाव तेथे एसटी ही योजना शासनाद्वारे राबविण्यात आली. यांतर्गत गावागावात बस पोहोचण्याची सोय करण्यात आली. तसेच गावातील नागरिकांना बसची वाट पाहण्यासाठी गावागावांमध्ये रस्त्याच्या कडेला प्रवासी निवारे तयार करण्यात आले. नागरिकांना बसची वाट पाहताना अडचण येऊ नये, पाऊस व उन्हापासून त्यांचे रक्षण व्हावे या उदात्त हेतू त्यात होता. तसेच एस टी चालकालाही कुठे थांबायचे आहे हे लक्षात येण्यासाठीही निवारे उपयोगी पडतात. पण अनेक वर्षांत दुर्लक्ष झाल्याने प्रवासी निवाऱ्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली. निकृष्ठ बांधकामामुळे अनेक निवाऱ्यांना भेगा गेल्या. बसण्याची बाके निकामी झाली. परिणामी अनेक गावांतील प्रवासी निवारे धोक्याचे ठरत आहे. प्राण्यांनी त्यांना आपले आश्रयस्थान बनविले आहे. काही ठिकाणी त्यावर अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास येत आहे. मुलभूत सुविधांचीही वाणवा आहे. चित्रविचित्र जाहिरातींनीही विद्रूपिकरण झाले आहे.(शहर प्रतिनिधी)
एसटीचे निवारे भग्नावस्थेत
By admin | Updated: June 3, 2016 02:11 IST