शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचे चालक समृद्धी महामार्गाच्या कामावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 21:43 IST

त्यामुळे महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे वाहतूक उत्पन्न बुडाले. तोटा भरून काढण्यासाठी एसटीने मालवाहतूकही सुरू केली. जून महिन्यापासून एसटीच्या काही फेऱ्या सुरू करण्यात आल्या

ठळक मुद्देतीन महिन्यांपासून नाही वेतन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एसटीतील कामगार आणि कर्मचाऱ्यांचे वेतन मागील तीन महिन्यांपासून थकले आहे. यामुळे प्रचंड आर्थिक चणचण भासत असल्याने अनेक कामगार, कर्मचाऱ्यांनी समृद्धी महामार्गाच्या कामावर जाण्यास सुरुवात केली आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या देशभरासह संपूर्ण राज्यात मार्च महिन्यापासून पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले. परिणामी, तब्बल सहा महिने एसटीची चाके जागीच थांबली होती. त्यामुळे महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे वाहतूक उत्पन्न बुडाले. तोटा भरून काढण्यासाठी एसटीने मालवाहतूकही सुरू केली. जून महिन्यापासून एसटीच्या काही फेऱ्या सुरू करण्यात आल्या. त्यानंतरच्या काळात जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बससेवा सुरू करण्यात आली. मालवाहतुकीकडून एसटीला बऱ्यापैकी उत्पन्न मिळाले. मात्र, कोरोनामुळे एसटीला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. यामुळे महामंडळाचा आर्थिक गाडा पूर्वपदावर आला नाही. यामुळे संपूर्ण राज्यात कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनावर परिणाम झाला आहे. तीन महिन्यांपासून वेतन थकले आहे. यामुळे कर्मचारी, कामगारांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने एसटीचे चालक, कामगार यांनी चरितार्थ चालविण्यासाठी विविध लघु व्यवसाय स्वीकारले आहेत. तर काही चालकांनी समृद्धी महामार्गाच्या कामावर जाणे सुरू केले आहे. तर बस दुरुस्ती व इतर काम करणार्या कामगारांनीही खासगी वाहन दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला आहे. महामंडळाने वेतन तातडीने देण्याची गरज आहे.फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्सही नाहीदिवाळी सण अवघ्या पाच दिवसांवर असताना महामंडळाकडून वेतनाचा प्रश्न निकाली काढला जात नसून फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्सही देण्यात आलेला नाही. यामुळे एसटीच्या कामगार कर्मचाऱ्यांसह त्यांचे कुटुंबीय तणावात आहेत. दिवाळी सण साजरा कसा करायचा असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला असून आर्थिक अडचणींचे संकट घोंगावत आहे.अनेकांनी थाटला लघुव्यवसायराज्य परिवहन महामंडळात कार्यरत कर्मचारी, कामगारांना अतिशय तुटपुंजे वेतन मिळते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये वाहतूक उत्पन्न बंद झाल्याने कर्मचारी, कामगारांच्या वेतनावरही गंडांतर आले. बरेच महिने कर्मचाऱ्यांना निम्मेच वेतन देण्यात आले. तर ऑगस्टपासून वेतनच देण्यात आले नाही. त्यामुळे अनेकांनी लघुव्यवसाय थाटून उदरनिर्वाहाची व्यवस्था केली आहे. मात्र, यातही त्यांची आर्थिक ओढाताण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.