शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंकेचे खेळाडू सेवाग्राम आश्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 23:52 IST

विविधतेने नटलेल्या आणि पारंपारिक खेळांचा देश म्हणून भारताची ओळख आहे.

ठळक मुद्देमगनसंग्रहालय, बौद्ध स्तुप, गोपुरी, ग्रामोपयोगी विज्ञान केंद्राला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : विविधतेने नटलेल्या आणि पारंपारिक खेळांचा देश म्हणून भारताची ओळख आहे. या देशातील खेळांचा शास्त्रबद्ध अभ्यास, कौशल्य, तंत्र त्यासोबत खेळातील व्यवस्थापनाचे ज्ञान घेण्यासाठी श्रीलंकेतील ३० खेळाडू व चार अधिकारी अमरावती येथील हनूमान व्यायाम शाळेत प्रशिक्षण घेत आहे. या सर्व प्रशिक्षणार्थिंनी महात्मा गांधी आश्रमला भेट दिली. येथे पाहणी करून त्याचा इतिहास त्यांनी जाणून घेतला.आश्रमात प्रवेश केल्यानंतर कार्यकारी अधिकारी भावेश चव्हाण यांनी प्रमुख नॅशनल इन्स्टिट्युट आॅफ स्पोर्टस सायन्स कोलंबोचे रजिट्रार समन समरकोन यांचे सूतमाळ घालून स्वागत केले. चव्हाण यांनी आदी निवास, बापू कुटी, दप्तर, आखरी निवास, रसोडा आदिंसह गांधीजींच्या कार्याची माहिती दिली. परिसर, वातावरण आणि प्रार्थना भूमी पाहून सर्वजन अवाक् व भावूक झाल्याचे दिसून आले.अमरावती येथे १९ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर २०१७ पर्यंत प्रशिक्षण व अभ्यासक्रम पूर्ण करणार असून व्यायाम शाळेच्या दसरा मेळाव्यात प्रशिक्षणार्थी प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. श्रीलंका सरकारच्या खेळ व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने गतवर्षीपासून या खेळ व अभ्यासक्रमाचे धडे गिरविण्यासाठी आपल्या खेळाडूंना व अधिकाºयांना पाठवित आहे.सदर मेळाव्याला खेळ व क्रीडा मंत्री दयाश्री जयटोकरा, सचिव डॉ. डी. एम.आर.बी. डिसनाचके, संचालक जी.एल. साजीथ जयलाल उपस्थित होते. या संघासोबत हनुमान व्यायाम शाळेचे प्रा. रवी साहू, एम.बी.ए.चे विद्यार्थी कौशिक टप्पे, अनिकेत रघुवंशी, तसेच उर्मिला साहू, सचिन जोशी इत्यादीचा सहभाग होता. या विद्यार्थ्यांनी मगन संग्रहालय, बौद्ध स्तुप, गोपुरी, ग्रामोपयोगी विज्ञान केंद्र इत्यादी स्थळांना भेटी दिल्या. वर्धेतील या ऐतिहासिक वास्तुंचे दर्शन आणि महात्मा गांधी यांचे विचार घेवून वर्धेतुन निरोप घेतला.भारत-श्रीलंका दोन्ही देश जवळ असून दोन्ही देशाचे संबंध अधिक चांगले आहे. दोन्ही देशाच्या प्रधानमंत्र्यांनी हे संबंध अधिक चांगले रहावे यासाठी कटीबद्ध आहे. ही भूमी प्रेरणादायी असून याच देशातील भगवान गौतम बुद्ध असल्याने आमची अधिक श्रद्धा आहे. आश्रमात मोकळ्या मैदानावर आणि यात बौद्ध धर्माची प्रार्थना व्हावी हे विशेष. भारत देश आम्हाला जवळच वाटतो क्रीडा मंत्रालयाचा या देशात खेळाडूंना पाठविण्याचा प्रयत्न तो याच हेतूने आहे आम्ही धन्य झालो.- समन समरकोन, श्रीलंका संघाचे अधिकारी.