शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

एस.आर. जिनिंगचा परवाना निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 23:55 IST

येथील एस.आर. जिनिंगमध्ये शेतकऱ्याला आपला प्रामाणिकपणा सिद्ध करण्याकरिता एका हातात पाण्याने भरलेला ग्लास तर दुसऱ्या हातात कापूस घेऊन सत्यपणाची शपथ घ्यायला लावली. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच सर्वत्र खळबळ उडाली.

ठळक मुद्देशेतकऱ्याचा अवमान भोवला : आधार व युवा संघर्ष संघटनेच्या आंदोलनाला यश

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : येथील एस.आर. जिनिंगमध्ये शेतकऱ्याला आपला प्रामाणिकपणा सिद्ध करण्याकरिता एका हातात पाण्याने भरलेला ग्लास तर दुसऱ्या हातात कापूस घेऊन सत्यपणाची शपथ घ्यायला लावली. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच सर्वत्र खळबळ उडाली. शेतकऱ्याचा अवमान करणाऱ्या या जिनिंगचा परवाना रद्द करण्याची मागणी आधार व युवा संघर्ष संघटनेने बाजार समितीकडे लावून धरताच बाजार समितीने सोमवारी एस.आर. जिनिंगचा परवाना निलंबित केला.सोडी येथील शेतकरी अनिल मोहोड यांनी एस.आर.जिनिंगमध्ये कापूस विक्रीकरिता आणला होता. वाहनासह तोलाई करुन त्यांना काटापट्टी देण्यात आली. परंतू गाडी खाली करतांना जिनिंगच्या कर्मचाºयाने त्यांना ४ क्विंटल कापूस कमी असल्याचे सांगितले. मोहोड यांनी काटापट्टी दाखविली असता कर्मचाºयाने ती हिसकावून घेतली. त्यामुळे कर्मचारी व शेतकरी यांच्या वाद झाल्याने जिनिंगच्या मालकाला बोलाविण्यात आले. मालकाने आपल्याच कर्मचाऱ्याची बाजु घेत मोहोड यांना प्रामाणिकपणा सिध्द करण्यासाठी शपथ घ्यायला लावून अवमान केला. त्यामुळे संताप व्यक्त करीत आधार व युवा संघर्ष संघटनेच्यावतीने सोमवारी शेतकºयांना सोबत घेऊन बाजार समिती गाठली. यावेळी अन्यायग्रस्त शेतकरी अनिल मोहोडही सोबत होते. या सर्वांनी सभापती विद्याधर वानखेडे, उपसभापती रामकृष्ण उमाटे, सचिव आय.आय.सुफी यांच्याशी चर्चा करुन जिनिंगचा परवाना हंगामभर निलंबीत करण्याची मागणी केली. बाजार समितीने शनिवारीच एस.आर.कॉटन जिनिंग फॅक्ट्रीचे प्रमुख राजेश जोतवाणी यांनी नोटीस देऊन सोमवारी दुपारपर्यंत म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. त्यानंतर सोमवारी आंदोलकांच्या मागणीनुसार व जिनिंग मालकाच्या उत्तरानंतर जिनिंगचा परवाना निलंबीत करण्याचा आदेश पारित केला.यावेळी आधार संघटनेचे विदर्भ अध्यक्ष जतीन रणनवरे, शुभम झाडे, प्रशांत झाडे व युवा संघर्ष संघटनेचे अध्यक्ष शुभम लुंगे यांच्यासह दोन्ही संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :cottonकापूस