शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

फवारणी करताय; जरा जपून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 22:28 IST

पिकांवरील कीड घालविण्याकरिता शेतकºयांकडून विविध विषारी औषधांच्या फवारण्या केल्या जातात. हे औषध पिकांकरिता जरी तारक ठरत असले तरी शेतकºयांकरिता मारक ठरू लागले आहे.

ठळक मुद्देपिकांवर अळीचा प्रादुर्भाव : औषधी वापरताना शेतकºयांनी काळजी घेणे गरजेचे

प्रशांत हेलोंडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पिकांवरील कीड घालविण्याकरिता शेतकºयांकडून विविध विषारी औषधांच्या फवारण्या केल्या जातात. हे औषध पिकांकरिता जरी तारक ठरत असले तरी शेतकºयांकरिता मारक ठरू लागले आहे. फवारणीच्यावेळी आवश्यक काळजी घेतली नसल्याने जिल्ह्यात २० शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. यामुळे हा धोका टाळण्याकरिता फवारणी करताय; जरा जपूनच, असा संदेश देण्याची गरज निर्माण झाली आहे.यंदा पाऊस कमी आल्याने सोयाबीन, कपाशी, तुरी या पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. कपाशीवर पांढरी माशी, चिप्स, बोंडअळी, चुरडा यासह रोग दिसत आहे. या किडीवर उपाययोजना करण्याकरिता कृषी विभागाकडून अनेक औषधे सुचविल्या जातात. या औषधात विषारी तथा शरीरास हानीकारक घटक असतात. या घटकांचा फवारणी करणाºयाच्या शरीरावर विपरीत परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.हा प्रकार केवळ निष्काळजीमुळे घडल्याने शेतकºयांनी फवारणी करताना काळजी घेणे गरजेचे झाले आहे. फवारणी करताना शेतकºयांनी हातात ग्लोज, चेहºयाला मास्क बांधणे गरजेचे आहे. असे न केल्यास औषधी फवारताना ते हवेत उडून नाका, तोंडातून शरीरात जाते. यामुळे मळमळ, उलटी आदी लक्षणे दिसून येतात. यावर त्वरित औषधोपचार घेणेच इष्ट ठरते. अन्यथा जीवित हानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. विदर्भातील अन्य जिल्ह्यात मात्र उपचार घेणाºयांची संख्या मोठी असल्याचे दिसून आहे.औषधीच्या संपर्काने काय दिसतात लक्षणेफवारणी करण्यासाठी वापरण्यात येणाºया औषधींमध्ये विषारी घटकद्रव्य अधिक प्रमाणात असतात. यामुळे ते शरीरासाठी हानीकारक ठरू शकतात. काही औषधी अंगावर लागली तरी त्याचे परिणाम जाणवतात. हातावर लागल्यास अ‍ॅलर्जी असलेल्या व्यक्तीला अंगावर पुरळ येणे, फोड येणे आदी लक्षणे दिसून येतात. हवेत उडून नाका-तोंडातून हे औषध पोटात गेल्यास मळमळ होणे, हे लक्षण दिसते; पण फवारणी दरम्यान, तंबाखू, खर्रा आदी मादक पदार्थांचे सेवन केल्यास औषधी तोंडात जाते. यामुळे मळमळ होणे, उलटी येणे, चक्कर येणे, अंगाला खाज सुटणे आदी लक्षणे आढळून येतात. यावर त्वरित उपचार घेणेच गरजेचे ठरते.काय घेतली पाहिजे काळजीकपाशीवर वा अन्य कोणत्याही पिकांवर फवारणी करीत असताना झाड उंच असेल तर नाक-तोंड बांधले पाहिजे. हातात ग्लोव्हज घातले पाहिजेत. फवारणी सुरू असताना हात-पाय धुतल्याशिवाय कुठल्याही पदार्थाचे सेवन करू नये. कोणत्याही प्रकारे औषधी शरीराच्या आत जाऊ देऊ नये. फवारणी करताना फुल पॅन्ट आणि फुल शर्ट घातला पाहिजे. फवारणी लवकर व्हावी म्हणून पंपामध्ये अधिक पाणी भरले जाते; पण ते चुकीचे आहे. अधिक पाणी भरल्याने ते सांडून धोका होण्याची शक्यता असते. यासाठी पंपामध्ये पाणी कमी भरणे गरजेचे आहे. उन्ह अधिक असल्यास फवारणी करताना घाम येतो. यातूनही शरीरावर औषधींचा परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.जैविक खते, औषधीच योग्यरासायनिक खते, औषधांच्या अतिरेकी वापरामुळे जमिनीचा पोत घसरत आहेत. शिवाय विविध रासायनिक औषधींमुळे मानवी जीवनासही धोका निर्माण झालेला आहे. हा प्रकार टाळण्याकरिता शेतकºयांनी जैविक शेतीकडे वळणेच गरजेचे झाले आहे. गांडूळ खत, जैविक औषधी यांच्या वापरातूनही चांगले उत्पादन घेता येत असल्याचे शेतकºयांनीच सिद्ध केले आहे. यातील औषधांमुळे शेतकºयांना फारसा धोका नसतो. यामुळे शेतकºयांनी जैविक शेतीची कास धरणे गरजेचे झाले आहे.शेतकरी, शेतमजुरांनी फवारणी करताना संपूर्ण काळजी घेणेच गरजेचे असते. तोंडाला मास्क लावल्याशिवाय फवारणी करू नये. फवारणी करताना विषबाधा झालेल्या वर्षभरात दोन-तीन रुग्णांची नोंद आहे; पण त्यांच्यावर विष घालविण्याच्या औषधोपचाराची गरज पडली नाही.- डॉ. गोपाळ नारळवार, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, पुलगाव.सध्याची औषधी फारशी विषारी नाहीत. असे असले तरी शेतकºयांनी काळजी घेणे गरजेचे असते. पीक उंच असल्यास नाक-तोंड बांधून तथा फुल पॅन्ट व शर्ट घालूनच फवारणी केली पाहिजे.- पांडुरंग बाभूळकर, व्यावसायिक, समुद्रपूर.