शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भस्तरीय खो-खो स्पर्धेला क्रीडा ज्योत प्रज्वलनाने प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:37 IST

स्थानिक नगर पालिकेद्वारे आयोजित पालकमंत्री चषक विदर्भस्तरीय खो-खो स्पर्धेच्या उद्घाटनपर कार्यक्रमापूर्वी शुक्रवारी सायंकाळी क्रीडा ज्योत प्रज्वलित करून शहरातून रॅली काढण्यात आली. या क्रीडा ज्योत रॅलीला उपविभागीय महसूल अधिकारी स्मिता पाटील यांनी हिरवी झेंडी दाखविली.

ठळक मुद्दे पालकमंत्री चषक : महिलांचे ९ तर पुरूषांचे १२ संघ सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक नगर पालिकेद्वारे आयोजित पालकमंत्री चषक विदर्भस्तरीय खो-खो स्पर्धेच्या उद्घाटनपर कार्यक्रमापूर्वी शुक्रवारी सायंकाळी क्रीडा ज्योत प्रज्वलित करून शहरातून रॅली काढण्यात आली. या क्रीडा ज्योत रॅलीला उपविभागीय महसूल अधिकारी स्मिता पाटील यांनी हिरवी झेंडी दाखविली.जुन्या आरटीओ मैदानाच्या परिसरातून निघालेल्या क्रीडा ज्योत रॅलीने शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण केले. रॅलीचा समारोप जुन्या आरटीओ मैदानाच्या परिसरात झाला. यानंतर खो-खो स्पर्धेचा उद्घाटनपर कार्यक्रम पार पडला. क्रीडा ज्योत रॅलीच्या शुभारंभ प्रसंगी नगराध्यक्ष अतुल तराळे, न.प. उपाध्यक्ष प्रदीप ठाकूर, न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, काही ज्येष्ठ खो-खो खेळाडू आदी उपस्थित होते. या खो-खो स्पर्धेत महिलांचे नऊ तर पुरूषांचे १२ असे एकूण २१ संघ सहभागी झाले आहेत. उद्घाटनपर सामना पुरूष गटात विदर्भ क्रीडा मंडळ काटोल विरूद्ध राजापेठ स्पोर्टिंग क्लब अमरावती आणि महिला गटात नव जयहिंद क्रीडा मंडळ यवतमाळ विरूद्ध रामनगर स्पोर्टींग क्लब पुलई यांच्यात खेळण्यात आला.चार सामन्यांचा लुटला आनंदशुक्रवारी सायंकाळी उशीरा मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटनपर कार्यक्रम पार पडल्यानंतर रात्री पुरुष गटात विदर्भ क्रीडा मंडळ काटोल विरूद्ध राजापेठ स्पोर्टींग क्लब अमरावती, तुळजाभवानी क्रीडा मंडळ परतवाडा विरूद्ध नव महाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर आणि महिला गटात नव जयहिंद क्रीडा मंडळ यवतमाळ विरूद्ध रामनगर स्पोर्टींग क्लब पुलई तथा ह्युमॅनिटी स्पोर्टींग क्लब परतवाडा विरूद्ध जय हिंद क्रीडा मंडळ पचखेडी जि. नागपूर यांच्यात खो-खो चा खेळ रंगला होता. चारही सामन्यांचा खो-खो प्रेमींनी आनंद लुटला.