शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

‘विदर्भ बंधन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: August 9, 2014 23:52 IST

वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. विदर्भ राज्य आता नाही तर कधीच नाही, असा सूर आवळत या मागणीकरिता विदर्भवाद्यांनी पुकारलेल्या रेल रोको, बस रोको आंदोलनाला

बस देखो आंदोलन : २५ हजार नागरिकांना विदर्भ बंधनवर्धा : वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. विदर्भ राज्य आता नाही तर कधीच नाही, असा सूर आवळत या मागणीकरिता विदर्भवाद्यांनी पुकारलेल्या रेल रोको, बस रोको आंदोलनाला वर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शनिवारी वर्धा बसस्थानकावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांना विदर्भ बंधन बांधून वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीकडे लक्ष वेधले. या आंदोलनादरम्यान २५ हजारांवर प्रवाशांसह नागरिकांना ‘विदर्भ बंधन’ बांधून वेगळ्या विदर्भाचे महत्त्व पटवून दिले. जनमंच आणि आम्ही वर्धेकर समितीच्यावतीने वर्धेत सदर आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनासाठी आम्ही वर्धेकर समितीने जनतेत विविध मार्गाने जनजागृती करीत होती. सकाळी १०.३० वाजतापासूनच आम्ही वर्धेकर समितीचे पदाधिकारी, सभासद असंख्य विदर्भवाद्यांसह येथील बसस्थानकावर ‘विदर्भ बंधन’ घेऊन पोहचले. प्रत्येकाच्या डोक्यावर ‘जय विदर्भ’ अंकित केलेली टोपी होती. प्रत्येकजण हातात ‘विदर्भ बंधन’ घेऊन बसमधून उतरणाऱ्या आणि बसस्थानकाकडे जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना वेगळ्या विदर्भ राज्याचे महत्त्व पटवून पत्रक देत हे बंधन मनगटावर बांधत होते. प्रवाशीही मोठ्या कुतुहलाने हे बंधन स्वीकारत होते. इतकेच नव्हे, तर बसस्थानक परिसरातील दुकानदारांसह त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांनाही हे बंधन बांधले. दरम्यान सुमारे २५ हजार नागरिकांना या आंदोलनात सहभागी करुन घेतले. क्रांतीदिनी रेल रोको, बस रोको आंदोलन करण्याचा इशारा जनमंच आणि आम्ही वर्धेकर समितीने वर्धेत घेतलेल्या एका बैठकीतूनच देण्यात आला होता हे विशेष. आम्ही वर्धेकरचे संयोजक हरिष इथापे, निमंत्रक संजय इंगळे तिगावकर, विजय जावंधिया, अविनाश काकडे, प्रदीप दाते, भास्कर इथापे, विजय आगलावे, राजू गोरडे, प्रा. शेख हाशम, पद्माकर बावीस्कर, प्रदीप जैन, आशिष गोस्वामी, नंदकुमार वानखेडे, मनोज कत्रोजवार, अशोक कठाणे, सुदाम पवार, वैभव काशीकर, मुरली केला, प्रदीप बजाज, सुनील पटेल, जितेंद्र झाडे, गुड्डू पठाण, प्रमोद गिरडकर, मुकेश लुथडे, संगिता इंगळे तिगावकर या मंडळींसह कार्यकर्त्यांची ये-जा करणाऱ्या नागरिकांना ‘विदर्भ बंधन’ बांधत वेगळ्या विदर्भाची गरज पटवून दिली. (प्रतिनिधी)