शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

लाखो रुपये खर्चूनही हिरव्या स्वप्नांचा चुराडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 23:48 IST

शतकोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत राज्यात सर्वत्र वृक्षलागवड करण्यात आली. या योजनेअंतर्गत लावलेली झाडे संबंधित ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे अखेरच्या घटका मोजत असून अनेक झाडे वाळलेली आहेत.

ठळक मुद्देग्रा. पं.अंतर्गत लावलेली झाडे वाळली । पं.स.चा अनागोंदी कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : शतकोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत राज्यात सर्वत्र वृक्षलागवड करण्यात आली. या योजनेअंतर्गत लावलेली झाडे संबंधित ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे अखेरच्या घटका मोजत असून अनेक झाडे वाळलेली आहेत.विरुळ व हुसेनपूर ग्रामपंचायतीअंतर्गत पावसाळ्यात लाखो रुपये खर्च करून मोकळ्या जागेवर झाडे लावण्यात आली. या झाडांच्या संगोपनासाठी चार ते पाच महिने मजुरांना ठेवण्यात आले, परंतु ऐन उन्हाळा लागताच झाडांचे संगोपन करणारे मजूर बंद केल्याने पंधरा दिवसातच झाडे वाळायला सुरुवात झाली. यामुळे लाखो रुपये खर्च करूनही हिरव्या स्वप्नाचा चुराडा झालेला आहे. याला स्थानिक ग्रामपंचायत जबाबदार असून कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.शासनाने प्रामाणिक हेतू ठेवून संपूर्ण राज्यभर प्रत्येक विभागामार्फत झाडे लावण्याचा मोठा निर्णय घेतला. यात तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीने झाडे जगवली, परंतु काही ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांनी याकडे दुर्लक्ष केल्याने झाडे वाळली आहेत. येथील भवानी वॉर्डातील तलावाजवळ ग्रामपंचायतीने हजारो झाडे लावलेली असताना मात्र निष्काळजीपणामुळे आज ही झाडे वाळत आहेत. हाच प्रकार हुसेनपूर ग्रामपंचायतीमध्येही दिसून आला, त्यामुळे यावर झालेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेलेला असून संबंधित गटविकास अधिकाऱ्यांचा दुर्लक्षितपणा याला कारणीभूत ठरला आहे. या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी काही सामाजिक व राजकीय संघटनांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. याकडे नव्यानेच रुजू झालेल्या मुख्य कार्यपालन अधिकाºयांनी लक्ष देण्याची मागणी आहे.वृक्षलागवड ठरली फोटोपुरती मर्यादितविविध नावाखाली वृक्षलागवड योजनेची अंमलबजावणी केली जाते. वृक्षलागवड करताना फोटो सेशन करूनही प्रसिद्धीही मिळविली जाते. त्यानंतर झाडांच्या संगोपनाकडे संबंधितांकडून दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे वृक्षलागवड योजना अनेक ठिकाणी इव्हेंटच ठरली आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत