लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा लोकसभा क्षेत्रातील पुलगाव, वर्धा व सिंदी रेल्वे येथील रेल्वे उड्डाणपुल बांधकामाला सुरूवात झाली आहे. परंतु, हे तिनही कामे कासवगतीनेच केली जात असल्याने सदर काम तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, अशा सूचना खा. रामदास तडस यांनी दिल्या. येथील शासकीय विश्राम गृह येथे शुक्रवारी खा. रामदास तडस यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी सदर सूचना अधिकाऱ्यांना केल्यात.प्रशासकीय स्तरावर प्रलंबित असलेल्या काही तांत्रिक बाबींचे निवारण करण्याच्या उद्देशाने ही आढावा बैठक घेण्यात आली होती. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन टाके, जिल्हा नियोजन अधिकारी टेंभूर्णे, उपअभियंता पैठणकर, उपअभियंता संजय मंत्री, शाखा अभियंता भगत, हिवरे, महेश मोकलकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.वर्धा लोकसभा क्षेत्रात २०१४ नंतर प्रलंबित असलेल्या वर्धा, पुलगाव व सिंदी रेल्वे येथील उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामांना सुरवात झाली. वर्धा येथील आचार्य विनोबा भावे उड्डाणुलाचे कार्य प्रगतीपथावर आहे. सदर कामांमध्ये तांत्रिक अडचणी दूर करुन रेल्वे विभागाशी योग्य समन्वय साधून कार्याला गती देण्याकरिता आवश्यक उपाययोजना कराव्या असे यावेळी खा. तडस म्हणाले.तर पुलगांव रेल्वे उड्डापूलाचे कार्य जमीन अधिग्रहन मोबदला व रेल्वे विभागाशी निगडीत काही तांत्रिक बाबीमुळे कासवगतीेने सुरु असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने सांगण्यात आले. यावर जमीन अधिकग्रहनासाठी विभागाने शासन स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी. सोबतच पुलाचे बांधकाम सुरु असेपंर्यत नदीकाठापासून जाणारा पोच रस्ता तातडीने दुरुस्त करावा, असे खा. तडस यांनी सांगितले.सिंदी (रेल्वे) रेल्वे उड्डापूलाचे कार्य कालबद्ध वेळेत पूर्ण करण्यासाठी रेल्वे विभाग, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक आयोजित करुन सर्व कामे मार्गी लावावी असे ठरविण्यात आले. १७ जून पासून महाराष्ट्र विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होणार आहे. या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने वर्धा लोकसभा मतदार संघातील प्रमुख जिल्हा मार्ग व राज्य महामार्गावरील विविध रस्ते व पूल दुरुस्तीची कामे प्रस्तावीत करण्यात आली आहे. या सर्व प्रस्तावीत कामांची माहिती खा. तडस जाणून घेतली. यावेळी स्थानिक खासदार निधी तसेच सेवाग्राम विकास आराखडा, केंद्रीय मार्ग निधी आदींच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी प्रणव जोशी यांच्यासह काही भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
तिन्ही रेल्वे उड्डाणपुलाच्या कामांना गती द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 22:30 IST
वर्धा लोकसभा क्षेत्रातील पुलगाव, वर्धा व सिंदी रेल्वे येथील रेल्वे उड्डाणपुल बांधकामाला सुरूवात झाली आहे. परंतु, हे तिनही कामे कासवगतीनेच केली जात असल्याने सदर काम तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, अशा सूचना खा. रामदास तडस यांनी दिल्या.
तिन्ही रेल्वे उड्डाणपुलाच्या कामांना गती द्या
ठळक मुद्देरेल्वेसह सार्वजनिक बांधकाम विभागाला खासदारांच्या सूचना