शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

देवळीत राबविली विशेष स्वच्छता मोहीम

By admin | Updated: January 7, 2017 01:07 IST

शासनाच्या निर्देशानुसार शहरात स्वच्छतेची विशेष मोहिम राबविण्यात आली. यात खासदार रामदास तडस

स्वच्छ भारत अभियान : न.प. पदाधिकारी, पोलीस अधिकारी, प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा सहभाग देवळी : शासनाच्या निर्देशानुसार शहरात स्वच्छतेची विशेष मोहिम राबविण्यात आली. यात खासदार रामदास तडस यांनी सक्रीय सहभाग घेतला. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला. मागील सप्ताहात न.प. पदाधिकारी, पोलीस अधिकारी, तसेच कॉलेजचे प्राध्यापक व एनसीसी विद्यार्थ्यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहिम वेगवेगळ्या वॉर्ड परिसरात राबवून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. शुक्रवारी सकाळी खासदार रामदास तडस यांच्या प्रमुख उपस्थितीत न.प. ते आठवडी बाजार चौक पर्यंतचा परिसर सर्वांनी हातात झाडू घेवून स्वच्छ केला. परिसरातील कचरा संकलीत करुन विल्हेवाट लावण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत नगराध्यक्ष सुचिता मडावी, गटनेता शोभा तडस, उपाध्यक्ष प्रा. डॉ. नरेंद्र मदनकर, शिक्षण सभापती कल्पना ढोक, आरोग्य सभापती सुनिता बकाने, महिला व बालकल्याण सभापती सुनिता ताडाम, मुख्याधिकारी विजय देशमुख, प्रशासकीय अधिकारी भास्कर साखरकर आदींचा सहभाग होता. मिरणनाथ महाराज पटांगणात पोलीस विभागाच्यावतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. याठिकाणी नुकत्याच पार पडलेल्या यात्रेमुळे येथे कचरा गोळा झाला होता. ही मोहिम पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने, उपनिरीक्षक गजानन दराडे यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आली. इंदिरा नगर येथे एसएसएनजे महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाचे वतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश उपाध्यक्ष, प्राध्यापक गण, एनसीसी सैनिकांनी सहभाग घेतला. काळा पूल परिसरात न.प. सदस्य गौतम पोपटकर, शाम महाजन, अश्विनी काकडे, राजश्री देशमुख, सुरेश वैद्य यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. शहरात राबविण्यात आलेल्या या सर्व मोहिमेत न.प. पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता. विशेष स्वच्छता मोहिमेत न.प. सदस्य नंदू वैद्य, मिलिंद ठाकरे, संध्या कारोटकर, संगीता तराळे, बांधकाम सभापती सारीका लाकडे, मारोतराव मरघाडे, किशोर चिंचपाले, नितीन सायंकार, सुनिल ताकसांडे, महादेव सुरकार, प्रशांत धोबे, आनंद झाडे, राजू भोयर, सुनिल खोंड, धिरज फुलझेले, अशोक झाडे, गजानन खोंड, मंगेश महाजन, उत्तम कामडी, अरविंद खोंडे, शंकर तडस, अंबादास कुडवे व नागरिकांनी सहभाग दिला.(प्रतिनिधी)