शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ढेपीसाेबतच सोयाबीननेही खाल्ला भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 12:05 IST

Wardha News जगभरात सोयाबीनची टंचाई निर्माण झाली आहे. ढेपीकरिता मागणी वाढल्याने सोयाबीननेही चांगलाच भाव खाल्ला आहे.

ठळक मुद्देजागतिक बाजारात तेजी सोयाबीनचे दर दहा हजारांच्या उंबरठ्यावर

महेश सायखेडे

 लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : गेल्या हंगामात जगात सोयाबीनची नापिकीच राहिली. त्यामुळे जगभरात सोयाबीनची टंचाई निर्माण झाली आहे. ढेपीकरिता मागणी वाढल्याने सोयाबीननेही चांगलाच भाव खाल्ला आहे. सध्या बाजारपेठेत ८ हजार रुपयांपासून ९ हजार ६०० रुपयांपर्यंत भाव वधारले असून यात शेतकऱ्यांना किती फायदा होईल, यावर मात्र प्रश्नचिन्हच दिसून येत आहे. सध्या जागतिक बाजारपेठेत नॉन जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्ग्यानिझम (जीएमओ) पद्धतीच्या सोयाबीन ढेपीची मागणी वाढल्याने सोयाबीनच्या तुटवड्यामुळे दरातही वाढ झाली आहे.

वर्धा जिल्ह्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. असे असले तरी हे साेयाबीन जेनेटिकली मॉडिफाईड नाही. मागील हंगामात सोयाबीन पीक अंतिम टप्प्यात असताना परतीच्या पावसामुळे सोयाबीन उत्पादकांना चांगलाच फटका बसला. त्यावेळी सुरुवातीला सोयाबीनला प्रतिक्विंटल ३ हजार ते ४ हजार रुपये भाव मिळाला. आता अचानक जागतिक बाजारपेठेत नॉन जीएमओ सोयाबीनच्या ढेपीचे भाव वधारले आहेत. त्यामुळेच सोयाबीनच्या भावातही तेजी आली असून सध्या तुरी पेक्षा जास्त भाव मिळत आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंगणघाट बाजारपेठेत बुधवारी तुरीला प्रतिक्विंटल ५ हजार ६०० ते ६ हजार ४६५ रुपये भाव मिळाला. तर सोयाबीनला प्रतिक्विंटल ८ हजार ते ९ हजार ६८० रुपये भाव देण्यात आला. सोयाबीनची ही भाववाढ पाहून शेतकऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

मागील हंगामात जगात सोयाबीनची नापिकी राहिली. त्यामुळे नॉन जीएमओ सोयाबीनच्या ढेपीचे दर वाढले आहे. त्याचा परिणाम सोयाबीनच्या भावावर पडल्याचे दिसून येत आहे. सोयाबीनच्या भावात नॉन जीएमओ ढेपीच्या दरवाढीमुळेच तेजी आली आहे. पण, ही तेजी किती दिवस कायम राहते, यावर ही भाववाढ अवलंबून राहील.

- विजय जावंधिया, कृषी तज्ज्ञ वर्धा.

टॅग्स :agricultureशेती