शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

१७ टक्के क्षेत्रात दुबार पेरणी

By admin | Updated: June 25, 2017 00:34 IST

यावर्षी मान्सून अगदी वेळेवर येणार म्हणून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या; पण मागील दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी कोलमडला आहे.

पावसाची दडी : पुन्हा सावकारांकडून कर्ज घेण्याची वेळ लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी (शहीद) : यावर्षी मान्सून अगदी वेळेवर येणार म्हणून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या; पण मागील दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी कोलमडला आहे. आष्टीसह तालुक्यात १७ टक्के पेरण्या फसल्या आहेत. यामुळे दुबार पेरणी करावी लागणार आहे. बियाणे व पेरणी खर्चाकरिता बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याने शेतकऱ्यांना पुन्हा सावकाराची पायरी गाठून जुगाड करावे लागणार असल्याचे दिसते. मागील वर्षी कापूस व तुरीला योग्य भाव मिळाला नाही. शासनाच्या लेटलतिफ धोरणाचा फटका उत्पन्नाला बसला आहे. यामुळे शेतकरी धायकुतीस आले आहेत. मोठ्या कालावधीनंतर कर्जमाफीची घोषणा झाली; पण बँकांना अद्याप आदेश आले नाहीत. त्याचा फटका कर्ज वाटपालाही बसला आहे. १० हजार रुपये नगदी देण्याचा निर्णयही अद्याप कागदावरच आहे. यामुळे पेरणीसाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद करण्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. जून महिना जवळपास संपत आला आहे. जुलै महिन्यात पाऊस काय करतो, यावर शेतकऱ्यांचे गणित अवलंबून आहे. तालुका कृषी अधिकारी प्रमोद पेटकर यांना पेरणीबाबत विचारणा केली असता तीन दिवस झालेला पावसाळा गृहित धरून १७ टक्के शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली; पण त्यानंतर पावसाने दडी मारल्याने स्थिती गंभीर झाली आहे. शेतकऱ्यांनी चांगला, समाधानकारक पाऊस पडल्याशिवाय पेरण्या करू नये, असे आवाहन पेटकर यांनी केले आहे. सध्या ढगाळ वातावरण आहे. शेतीची पेरणीपूर्व मशागत पूर्ण झाली आहे. यामुळे पावसावर सर्वकाही अवलंबून आहे. अल्पभूधारक व मध्यमवर्गीय शेतकऱ्यांची संख्या ७० टक्के आहे. या गटातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीकरिता प्रतीक्षा करीत असल्याचे दिसून येते. शासनाने आदेश बँकांपर्यंत पोहोचविले नाहीत. यामुळे मोठी तारांबळ उडत आहे. शेतकरी बँकामध्ये गेल्यानंतर कर्जमाफी आदेश आल्यानंतरच नवीन कर्ज देणार असल्याचे बँक आॅफ इंडिया व भारतीय स्टेट बँकेकडून सांगण्यात आले आहे. पाच एकरावरील शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरल्याने तत्सम शेतकऱ्यांना कर्ज देण्यात येणार आहे. खरीप हंगामातील लगबग सुरू झाली तरी सर्व काही पावसावर अवलंबून आहे. आष्टी तालुक्यात पाऊस यावा म्हणून शेतकरी धोंडी काढत आहे. ग्रामीण भागात विविध नवस पूर्ण केले जात आहे. कर्जातील विलंबाचाही पेरणीवर परिणाम आष्टी तालुक्यात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व को-आॅपरेटीव्ह बँक बंद झाल्याने कर्जाचा प्रश्न गंभीर झाला आहे. शासनाने कर्जमाफी दिल्यावर या बँकेला फायदा होईल; पण राष्ट्रीय बँका शेतकऱ्यांना नवीन कर्ज देण्यास विलंब लावू शकते. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका निभविण्याची मागणी शेतकरी करीत आहे. नोड्यू प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच कर्जाची प्रकरणे मंजूर होऊ शकतात. त्याचाही परिणाम पेरणीवर होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता यंदा समाधानकारक पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती; पण प्रारंभीच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. काही शेतकऱ्यांनी पेरण्याच केल्या नाहीत. त्यांना विलंब झाल्यास उत्पादनावरही विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.