शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

भूईमुंगाचा पेरा ३९.२६ टक्के

By admin | Updated: April 2, 2017 00:54 IST

सिंचनाची सोय असलेल्या जिल्ह्यातील शेतकरी उन्हाळ्याच्या दिवसांत भाजीपाला, सूर्यफूल यासह मोठ्या प्रमाणात भूईमुंग पिकाची लागवड करतात.

यंदा १६२० हेक्टरचे नियोजन : गतवर्षी ३४९८ हेक्टरमध्ये होती पेरणी वर्धा : सिंचनाची सोय असलेल्या जिल्ह्यातील शेतकरी उन्हाळ्याच्या दिवसांत भाजीपाला, सूर्यफूल यासह मोठ्या प्रमाणात भूईमुंग पिकाची लागवड करतात. यंदा १ हजार ६२० हेक्टरमध्ये भूईमुंग पिकाची लागवड होईल, असा जिल्ह्यातील कृषी विभागाचा अंदाज आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यात ६३६ हेक्टरमध्ये भूईमुंगाची लागवड करण्यात आली आहे. त्याची टक्केवारी ३९.२६ इतकी आहे. गतवर्षी ३ हजार ४९८ हेक्टरमध्ये भूईमुंग पिकाची लागवड करण्यात आली होती. भूईमुंग पीक घेण्यासाठी हलकी, मध्यम प्रतीची, सेंद्रीय पदार्थ व कॅल्शियमचे भरपूर प्रमाण असलेली तसेच पाण्याचा उत्तम निचरा होणारी शेतजमीन लागते. गतवर्षी जिल्ह्यात एकूण १ हजार ६२० हेक्टर इतके उन्हाळी भूईमुंगाचे नियोजित क्षेत्र होते; पण जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भूईमुंग पिकाला प्रथम प्राधान्य दिल्याने त्यावेळी एकूण ३ हजार ४९८ हेक्टरमध्ये लागवड झाली. आर्वी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी ४५ हेक्टरमध्ये सूर्यफूलाचे उत्पादन घेतले होते. यंदाच्या वर्षी मागील वर्षी इतक्याच क्षेत्रात भूईमुंग पिकाची लागवड होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यातील ६३६ हेक्टरमध्ये भूईमुंग पिकाची लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षीपर्यंत कृषी विभागानेच भूईमुंग उत्पादक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात बियाणे उपलब्ध करून दिले होते; पण यंदा कृषी विभागाच्या सहकार्याने महाबीज सोबत समन्वय साधून ६० टक्के दराने बियाणे उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भूईमुंग पिकाकडील कल वाढावा म्हणून कृषी विभागाकडूनही प्रयत्न सुरू आहेत.(शहर प्रतिनिधी) सेलू तालुक्यात होती सर्वाधिक लागवड मागील वर्षी जिल्ह्यात १ हजार ६२० हेक्टरमध्ये भूईमुंग पिकाची लागवड होईल, असा कृषी विभागाचा अंदाज होता. यात सेलू तालुक्यात सर्वाधिक २ हजार २०० हेक्टरचा पेरा झाला होता. आर्वी तालुक्यात ५२५ हेक्टर, कारंजा (घा.) १९७, आष्टी (श.) २०९, वर्धा १२०, देवळी २३५ तर समुद्रपूर तालुकयात १२ हेक्टरमध्ये उन्हाळी भूईमुंगाचे पीक घेण्यात आले. त्याची टक्केवारी २३३ इतकी होती.