शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठ उघडताच उसळली नागरिकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 19:05 IST

Wardha news सोमवार ३१ मे रोजी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी राज्य शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून कठोर निर्बंधात थोडी शिथिलता दिली आहे. याच शिथिलतेचा पहिल्या दिवस असलेल्या मंगळवारी अत्यावश्यक सेवेसह इतर सेवेची प्रतिष्ठानेही उघडल्या गेल्याने नागरिकांनी विविध साहित्य खरेदीसाठी वर्धा शहरातील बाजारपेठेत एकच गर्दी केली होती.

ठळक मुद्दे२४ दिवसानंतर उघडली इतर सेवेची दुकाने

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सोमवार ३१ मे रोजी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी राज्य शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून कठोर निर्बंधात थोडी शिथिलता दिली आहे. याच शिथिलतेचा पहिल्या दिवस असलेल्या मंगळवारी अत्यावश्यक सेवेसह इतर सेवेची प्रतिष्ठानेही उघडल्या गेल्याने नागरिकांनी विविध साहित्य खरेदीसाठी वर्धा शहरातील बाजारपेठेत एकच गर्दी केली होती.

वर्धा नगरपालिका व लगतच्या अकरा ग्रामपंचायती, पुलगाव शहर व लगतच्या दोन ग्रामपंचायती तसेच हिंगणघाट शहर तसेच लगतच्या चार ग्रामपंचायती क्षेत्रात कोविड संसर्गाचा पॉझिटिव्हिटी दर जादा असल्याने या क्षेत्रातील अत्यावश्यक वस्तू व सेवेची प्रतिष्ठाने सोमवार ते शुक्रवार तसेच इतर सेवेची दुकाने सोमवार, मंगळवार व बुधवारी सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेत तर जिल्ह्यातील उर्वरित क्षेत्रात मॉल व शॉपिंग सेंटर वगळता अत्यावश्यक व इतर सेवेची दुकाने सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी ७ ते १ या वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सदर शिथिलता मिळताच दुकाने उघडल्याने मंगळवारी वर्धा शहरातील मुख्य बाजारपेठेत नागरिकांची एकच गर्दी उसळली होती. नागरिकांच्या गर्दीमुळे बजाज चौक ते शिवाजी चौक या मार्गावर ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती.

सामाजिक अंतराच्या नियमाला मिळाली बगल

कोविड संकटाच्या काळात सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन प्रत्येक व्यक्तीने करावे, असा आग्रह जिल्हा प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु, मंगळवारी विविध दुकानांमध्ये याच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाला बगल मिळत असल्याचे चित्र बघावयास मिळाले.

काेविड नियंत्रण पथक करीत होते सूचना

नागरिकांची गर्दी ही कोविडचा झपाट्याने संसर्ग वाढण्यासाठी पोषक असून कुठल्याही परिस्थितीत नागरिकांची गर्दी होऊ नये तसेच बेशिस्तांवर कारवाई करण्यासाठी कोविड नियंत्रक पथक तयार करण्यात आली आहे. याच कोविड नियंत्रण पथकातील अधिकारी व कर्मचारी मंगळवारी वर्धा शहरातील बाजारपेठेतील व्यावसायिकांसह नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वेळोवेळी करीत होते.

टॅग्स :Marketबाजार