शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींच्या समस्यांचे निराकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 05:00 IST

देशात ३७४३ जातींमध्ये विभागलेल्या ५२ टक्के ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्यासाठी २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसीसाठी स्वतंत्र कॉलम ठेवून जातनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रांतिक तैलीक समाजाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रामदास तडस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदनातून केली.महाराष्ट्रात ओबीसी समाजाची लोकसंख्या देशात ५२ टक्क्यांपेक्षा जास्त असूनही ओबीसी समाजाला टक्केवारीच्या प्रमाणात आरक्षण कमी आहे.

ठळक मुद्देराज्य प्रांतिक तैलीक महासभेची मागणी : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना निवेदन

लाेकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  देशात १९३१ पर्यंत प्रत्येक जातीची जनगणना होत होती. जनगणनेत प्रत्येक जातीची संख्या, शैक्षणिक, आर्थिक परिस्थिती बाबतची संपूर्ण माहिती नमूद करण्यात येत होती. १९४१ मध्ये देखील जनगणनेत जातीचा कॉलम होता. १९३१ च्या जनगणनेनुसार ओबीसीमध्ये ३७४३ जातींचा उल्लेख केला आहे. मात्र, १९४१ नंतर ओबीसी समाजाची जनगणना जातनिहाय झालेली नाही. जनगणना न झाल्याने ओबीसी समाजातील नागरिकांना आरक्षण दिले जात नाही. देशात ३७४३ जातींमध्ये विभागलेल्या ५२ टक्के ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्यासाठी २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसीसाठी स्वतंत्र कॉलम ठेवून जातनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रांतिक तैलीक समाजाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रामदास तडस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदनातून केली.महाराष्ट्रात ओबीसी समाजाची लोकसंख्या देशात ५२ टक्क्यांपेक्षा जास्त असूनही ओबीसी समाजाला टक्केवारीच्या प्रमाणात आरक्षण कमी आहे. आरक्षणाच्या क्रमवारीत इतर मागास वर्ग (ओबीसी) हा सातव्या क्रमांकावर आहे. ओबीसी आरक्षणातून काही जाती वगळून मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी अनेकांकडून करण्यात येत आहे. मराठा आरक्षणाला ओबीसी समाजाचा विरोध नसून त्यांच्या आरक्षणाला पाठिंबा आहे, परंतु, ओबीसी समाजातील आरक्षणामध्ये मराठा समाजाचा समावेश केल्यास ओबीसी समाज देशोधडीला लागण्याची शक्यता आहे.     ओबीसी मधील सर्व प्रवर्गाचे हित जोपासून सर्व बाबींचा विचार करुन इतर मागास वर्ग (ओबीसी) समाजाच्या आरक्षणामध्ये धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे,   अशी मागणी करण्यात आली.निवेदन देताना प्रांतिक तैलीक महासंघाचे महासचिव तथा ओबीसी आयोगाचे सदस्य डाॅ. भुषण कर्डीले, प्रांतिकचे कोषाध्यक्ष गजानन (नाना)शेलार, विदर्भ युवा आघाडीचे उपाध्यक्ष विपीन पिसे उपस्थित होते.

 

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीRamdas Tadasरामदास तडस