शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना तातडीने सौर कृषिपंप जोडणी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 22:18 IST

शेतकऱ्यांना तातडीने सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी,यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना सरु करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना योजनेची माहिती देऊन ज्या शेतकऱ्यांनी कृषिपंप जोडणीसाठी अर्ज केले आहे. त्यांना तातडीने सौर कृषिपंप जोडणी उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश आमदार डॉ. पंकज भोयर यांनी सोमवारी दिले.

ठळक मुद्देपंकज भोयर यांनी घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना तातडीने सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी,यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना सरु करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना योजनेची माहिती देऊन ज्या शेतकऱ्यांनी कृषिपंप जोडणीसाठी अर्ज केले आहे. त्यांना तातडीने सौर कृषिपंप जोडणी उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश आमदार डॉ. पंकज भोयर यांनी सोमवारी दिले.‘५४१ शेतकऱ्यांनी केली सौर कृषिपंपाची मागणी,पण मिळाली केवळ सात जणांना जोडणी’ या आशयाचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. याची दखल घेत आमदार डॉ.पंकज भोयर यांनी बोरगाव येथील मुख्य कार्यालयातसौर कृषिपंप योजनेचा आढावा घेतला. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता पारधी, भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष जयंत येरावार, जि.प. सदस्य सरस्वती मडावी, सेलू तालुका भाजप अध्यक्ष अशोक कलोडे, राजू मडावी, उपकार्यकारी अभियंता गावंडे, पडोळे, भुजबळ, मेंढे, करंडे, बाकरे, उज्जेनकर, सेलूचे अभियंता खोडे उपस्थित होते. आ.भोयर यांनी सौर कृषिपंप योजनेची माहिती जाणून घेतली. शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे सोयीचे व्हावे व पारंपरिक पद्धतीने कृषिपंपासाठी लागणाºया खर्चात बचत व्हावी, या उद्देशाने मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना सरकारने सुरू केली. या योजनेंतर्गत १ लक्ष सौर कृषिपंप शासन टप्प्या टप्प्याने उपलब्ध करून देणार आहे, असे सांगितले. अधीक्षक अभियंता देशपांडे यांनी सौर कृषिपंप योजनेची निविदा काढण्यात आली असल्याची माहिती दिली. लाभार्थ्यांना आॅनलाईन अर्ज संकेतस्थळावर भरावा लागणार असल्याने शेतकºयांना अनेक अडचणी यतात. त्यामुळे शाखा व उपविभागीय कार्यालयात महावितरणने आॅनलाईन अर्ज भरण्याची व्यवस्था करावी. ज्यांचे अर्ज प्राप्त झाले आहे, त्यांना तातडीने सौरकृषिपंपाची जोडणी देण्यात यावी तसेच योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचनाही आमदार भोयर यांनी अधिकाºयांना केल्या.