शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक तालुक्यात उभारणार माती परीक्षण प्रयोगशाळा

By admin | Updated: April 2, 2015 02:02 IST

शेतकऱ्यांना कृषी उत्पादन वाढीसाठी शेतात असलेल्या मातीचे परीक्षण करता यावे व त्यानुसार पिकांचे नियोजन करण्यास मदत मिळावी, ...

वर्धा : शेतकऱ्यांना कृषी उत्पादन वाढीसाठी शेतात असलेल्या मातीचे परीक्षण करता यावे व त्यानुसार पिकांचे नियोजन करण्यास मदत मिळावी, यासाठी प्रत्येक तालुक्यात माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय रसायन व उर्वक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.देवळी येथील नगर परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सव, शेतकरी मेळावा तसेच कृषी परिसंवादाचे उद्घाटन राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार व शेतकरी नेते पाशा पटेल होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष चित्रा रणनवरे, जि़प़ उपाध्यक्ष विलास कांबळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरिष गोडे, माजी खासदार विजय मुडे, सुरेश वाघमारे, शेतकरी नेते प्रशांत इंगळे तिगावकर, नगराध्यक्ष शोभा तडस, सभापती मिलिंद भेंडे, माजी उपाध्यक्ष राजेश बकाने, गटनेता विलास जोशी आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांवर अवेळी पाऊस व गारपीटीचे संकट आले असताना शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देताना ना. अहिर म्हणाले की, केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या मदतीची घोषणा केली आहे़ राज्य सरकारद्वारे झालेल्या नुकसानीबाबत सर्वेक्षण सुरू आहे. शेतकऱ्यांना यापुढेही मदत देण्यासाठी केंद्र सरकार निश्चित भूमिका घेईल, असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना कृषी महोत्सवाच्या माध्यमातून मार्गदर्शन होत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले़ पाशा पटेल यांनी जलसंधारण्याच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची अंमलबजाणी करण्याची आवश्यकता असून प्रत्येक शेतात जलसंधारणाचा कार्यक्रम राबवावा, असे सांगितले़ खासदार रामदास तडस यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली. प्रकल्पाला गती देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे व नवीन तंत्रज्ञान आत्मसात करता यावे म्हणून कृषी मेळावा आयोजित केल्याचे खा. तडस म्हणाले.(प्रतिनिधी)