शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

मातीपासून श्रीगणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:08 IST

सामाजिक बांधिलकी असणाऱ्या वर्ध्यातील कुबेरकरानी पर्यावरणपूरक उपक्रम घेण्याच्या दृष्टीने २५ ऑगस्टला तेजस भातकुलकर यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षणाअंतर्गत त्यांच्या म्हाडा कॉलनी येथील निवासस्थानी मातीच्या श्री गणेश मूर्ती बनवण्याची प्रात्यक्षिक कार्यशाळा आयोजित केली होती.

ठळक मुद्देकुबेर फाऊंडेशनचा उपक्रम : २९ विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सामाजिक बांधिलकी असणाऱ्या वर्ध्यातील कुबेरकरानी पर्यावरणपूरक उपक्रम घेण्याच्या दृष्टीने २५ ऑगस्टला तेजस भातकुलकर यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षणाअंतर्गत त्यांच्या म्हाडा कॉलनी येथील निवासस्थानी मातीच्या श्री गणेश मूर्ती बनवण्याची प्रात्यक्षिक कार्यशाळा आयोजित केली होती.तब्बल २९ विद्यार्थी कार्यशाळेला सर्व सामग्री सहित श्री गणेश साकारायला सज्ज होते. विद्यार्थ्यांनी मूर्ती तयार करण्याचे धडे गिरविले. याप्रसंगी कुबेर फाउंडेशनच्या शैक्षणिक समितीच्या संचालिका मिनल गिरडकर यांनी फाउंडेशनची भूमिका मांडली.कार्यक्रमाला कार्यक्रमाला वर्ध्यातील कुबेरकर विलास देशमुख, पल्लवी बोदीले, संजय मुळे, सरिता साळवे, सीमा मुळे आदी सातत्याने विद्यार्थ्यांना आवश्यक अशी मदत करीत होते. तेजस भातकुलकर यांच्या कलेतून मुलांनी प्रेरणा घेऊन बिना साच्यातल्या सुंदर मूर्ती तयार केल्या. समारोपीय कार्यक्रमास जयश्री कोटगीरकर उपस्थित होत्या. सर्व विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षण ही काळाची गरज या संकल्पनेतून दरवर्षी आपणच आपला श्री गणेश साकारावा असे आवाहन कुबेर फाऊंडेशन तर्फे करण्यात आले. या उपक्रमाचे पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी कौतुक केले.प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे पर्यावरणावर विपरित परिणाम होत आहे. या मूर्ती नदी-तलाव आणि विहिरीत विसर्जित केल्याने त्यांचे विघटन होत नसून पाण्याचे नैसर्गिक झरे बंद होतात. त्यावरील रासायनिक रंगांमुळे याशिवाय पाण्यातील जीवजंतूही मृत्युमुखी पडतात, याकडे कुबेर फाउंडेशनने लक्ष वेधत कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना मातीच्या मूर्ती खरेदी करण्याचे यावेळी आवाहन केले. सोबतच मूर्ती नदीपात्रात विसर्जित न करता घरी बादली अथवा टबमध्ये करण्याचाही सल्ला दिला.

टॅग्स :Ganesh Mandal 2019गणेश मंडळ 2019