शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

समाजकार्यचे विद्यार्थी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:14 IST

आदिवासी विकास विभागाच्यावतीने काढण्यात आलेली अधिसूचना समाजकार्य महाविद्यालयात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांसह महाविद्यालयाच्या मुळावर उठल्याचा आरोप करीत.....

ठळक मुद्देआदिवासी विकास विभागाचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आदिवासी विकास विभागाच्यावतीने काढण्यात आलेली अधिसूचना समाजकार्य महाविद्यालयात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांसह महाविद्यालयाच्या मुळावर उठल्याचा आरोप करीत जिल्ह्यातील सर्वच समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची माहिती जिल्हाधिकाºयांना देत त्याची माहिती आदिवासी मंत्र्यांना देण्याकरिता एक निवेदन सादर केले.या सोबतच समाजकल्याण, आदिवासी विकास, महिला व बालकल्याण, कामगार विभागातील र्व एक, दोन आणि तीन पदे या अधिसूचनेमुळे धोक्यात आली आहेत. ती पदे समाजकार्य विषयात पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणाºया विद्यार्थ्यांना देण्यात यावा यासह इतर मागण्या पूर्ण करण्याकरिता बजाज चौकातून मोर्चा काढण्यात आला.आदिवासी मंत्रालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या निर्णयाविरोधात समाजकार्य महाविद्यालयाच्यावतीने एक संघर्ष कोअर समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्यावतीने हा मोर्चा काढण्यात आला होता. बजाज चौक परिसरातून निघालेल्या या मोर्चात सहभागी विद्यार्थ्यांनी रस्त्यांवर पथनाट्य सादर केले. क्रांतीगिते सादर करून येणाºया जाणाºया नागरिकांचे लक्ष वेधले.या मोर्चात आदिवासी विकास विभागाने घेतलेल्या निर्णयात दुरूस्ती करावी, समाज कल्याण (सामाजिक न्याय) चे मूळ सेवाप्रवेश नियम १९६४ व १९८० जसेच्या तसे ठेवण्यात यावे, यामध्ये बदल करण्यात येवू नये. महिला व बालविकास, कामगार विभाग, आदी विभागातील पदाकरिता निर्धारित समाजकार्य विषयातील पदवी ही शैक्षणिक अर्हता कायम ठेवावी, शासनाच्या विविध विभागात प्रकल्पात योजनेत कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या समाजकार्य पदवीधारकांची नियुक्ती करण्यात यावी, आदी मागण्यांचे फलक विद्यार्थ्यांच्या हाती झळकत होते.पोलीस ठाण्यात समुपदेशक नियुक्त कराप्रत्येक पोलीस ठाण्यात समुपदेशक म्हणून समाजकार्य पदवीधर नियुक्त करण्यात यावा. तसेच तुरूंग अधिकारी पदाची शैक्षणिक अर्हता सुद्धा समाजकार्य पदवीधर करावी अशी मागणी करण्यात आली. शिवाय शासन पुरस्कृत महामंडळे, आयोग आदींवर समाजकार्य पदवीधारकांची नियुक्त करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.