शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

लघुपटातून विद्यार्थ्यांनी मांडल्या सामाजिक समस्या

By admin | Updated: April 22, 2017 02:09 IST

अद्यावत तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ स्वत:च्या उत्कर्षाकरिता न करता ज्ञानाचा वापर समाजाकरिता करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.

वर्धा : अद्यावत तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ स्वत:च्या उत्कर्षाकरिता न करता ज्ञानाचा वापर समाजाकरिता करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. बापुराव देशमुख अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी लघुपटांची संकल्पना पुढे आणली. यात वर्धेसह बल्लारशाह, चंद्रपूर, अमरावती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत सामाजिक जाणिवेचे विषय तरलतेने लघुपटाच्या माध्यमातून साकारले. या लघुपटातून राष्ट्रीय एकात्मता, स्वच्छता अभियान, महिला सुरक्षितता, नोटाबंदी, महिला सक्षमीकरण या विषयांचे चित्रिकरण विद्यार्थ्यांनी कल्पकतेने केले. सामाजिक जाणिवेच्या, समस्येच्या ‘क्लिप्स’ आपण सोशल मिडीयावर पाहत असतो. बघतो. याचा अभ्यास करून सामाजिक जाणीव व समस्यांच्या जागृती लघुपटाद्वारे मांडून एक अभिनव स्पर्धा महाविद्यालयीन स्तरावर घेण्यात आली. या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आॅनलाईन प्रवेश मागविले. एक दोन नव्हे तर पंधरा प्रवेश आलेत. यासोबत छायाचित्र प्रदर्शनात विविध महाविद्यालयातून २०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. लघुपटाचे परिक्षण रितेश वाडीभस्मे यांनी केले. बक्षीस वितरण समारंभाला प्राचार्य डॉ. महेंद्र गायकवाड, इलेक्ट्रीकल विभागप्रमुख प्रा. आर.जी. श्रीवास्तव, अ‍ॅड. चेतन सयाम, प्रा.एस.डी. झिलपे, विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष रोहीत ठक्कर, कार्यक्रम संयोजक आशिष चव्हाण उपस्थित होते. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या बुद्धीमत्तेचे कौतुक करून एक चांगला उपक्रम लघुपटाच्या माध्यमातून समोर आला असून याला पुढे व्यापक स्वरूप देण्यात येईल, असे सांगितले. लघुपट स्पर्धेत प्रथम परितोषिक अ‍ॅन्टी पॉटीमॅन या लघुपटाने संपादन केला तर प्राऊड टु.बी. इंडियन, फिनॉले फिन्स या लघुपटाने अनुक्रमे द्वितीय व तृतीय पारितोषिक मिळविले. छायाचित्र स्पर्धेमध्ये मनीष जैसल, द्वितीय नरेश गौतम व तृतीय पारितोषिक शुभम पाठक यांनी प्राप्त केले. हा अभिनव उपक्रम दरवर्षी घेण्यात येणार असून लघुपटाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासणे, समाजामध्ये जागृती निर्माण करणे आणि वास्तवाचं सादरीकरण करणे आदीचे चित्रीकरण करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.(स्थानिक प्रतिनिधी)