शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

नाट्यगृहासाठी सरसावल्या सामाजिक संघटना

By admin | Updated: July 14, 2017 01:29 IST

मागील दोन दशकांपासून वर्धेकरांनी सांस्कृतिक सभागृहाची, संकुलाची सातत्याने मागणी केली आहे;

जिल्हा प्रशासनाला निवेदन : सांस्कृतिक भवनाच्या बांधकामाची मागणीलोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : मागील दोन दशकांपासून वर्धेकरांनी सांस्कृतिक सभागृहाची, संकुलाची सातत्याने मागणी केली आहे; पण कलेचा वारसा लाभलेल्या वर्धा शहर तथा जिल्ह्याला नाट्यगृह लाभले नाही. प्रत्येकवेळी राज्य शासन व प्रशासनाने या मागणीला बगल दिली आहे. आता मात्र सामाजिक, सांस्कृतिक संघटना या मागणीसाठी पुन्हा एकदा सरसावल्या आहेत. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांना गुरूवारी निवेदनही देण्यात आले.वर्धेकरांचा हक्क असलेल्या जिल्हा सांस्कृतिक सभागृहाची दीर्घ काळापासून सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य संघटनांना करावी लागत आहे. वर्धा नगरी आणि जिल्हा आकारमानाने लहान असला तरी सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत प्रगत आणि क्रियाशील आहे. हा जिल्हा अनेक चळवळींचे माहेरघर राहिला आहे. येथील उपक्रमांचे अनुकरण राज्यात केले जाते. वर्षभर साहित्य, संगीत, नृत्य, नाट्य, व्याख्यान, परिसंवाद, रंगचित्रे, छायाचित्रे, हस्तकला प्रदर्शन आदी अनेक वैविध्यपूर्ण उपक्रम राबविले जातात; पण आंतरराष्ट्रीय ख्याती असलेला गांधी जिल्हा सांस्कृतिक संकुलापासून अद्यापही वंचित आहे. राज्य शासनाने वर्धा जिल्ह्याच्या वैभवात भर टाकणारे नाट्यगृह, सभाकक्ष, कलादालन, उद्यान, वाहनतळ यांचा समावेश असणारे सांस्कृतिक संकुल निर्माण करावे. पूढील पिढीला आपल्या कलागुणांच्या सादरीकरणाची तथा व्यक्तिमत्व विकासाची संधी द्यावी. जागा निश्चित केली असल्यास त्या जागेवर सांस्कृतिक सभागृहासाठी आरक्षित जागा, असा फलकही त्वरित लावण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना आम्ही वर्धेकरचे संजय इंगळे तिगावकर, अध्ययन भारतीचे हरिष इथापे, वसंत जळीत, सही फिल्मस्चे प्रा. गिरीष भोवरे, नई तालीम समितीचे प्रभाकर पुसदकर, निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे, निवृत्त अधिकारी भारतीय स्टेट बँक शत्रूघ्न मून, विदर्भ साहित्य संघ वर्धाचे सहसचिव प्रा. पद्माकर बाविस्कर, डॉ. राजेश देशपांडे, सेवा समितीचे उपाध्यक्ष प्रशांत कोल्हे यासह अन्य संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनाच्या प्रती खा. रामदास तडस, आ.डॉ. पंकज भोयर यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांना पाठविण्यात आल्या आहेत.नाट्य तथा सिनेसृष्टीला कलावंत देणारा जिल्हाच उपेक्षितकला, अभिनयाचा वारसा जोपासणारा जिल्हा म्हणून वर्धेची ओळख आहे. या जिल्ह्याने नाट्य तसे सिने सृष्टीला अनेक कलावंत दिले आहेत. कुणी मराठी सिनेमामध्ये नाव केले तर कुणी हास्याच्या मैफलीमध्ये वर्धेची मान उंचावली. नाट्य क्षेत्रात तर वर्धेची अनेक नाटकेही गाजलेली आहेत. असे असताना सुमारे दोन दशकांपासून वर्धेकरांना सांस्कृतिक सभागृहापासून वंचित राहावे लागत आहे, ही शोकांतिकाच म्हणावी लागते. अनेक वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक व साहित्य संघटनांनी वर्धा जिल्ह्याला सांस्कृतिक संकूल मिळावे म्हणून प्रयत्न केलेत; पण शासन, प्रशासनाने याकडे दुर्लक्षच केले. आता पुन्हा एकदा हा मुद्दा रेटण्यात आला असून शासनाने दखल घेण्याची मागणी होत आहे.