शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

देवळी तालुक्यातूनच सामाजिक व राजकीय धडे मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 22:38 IST

तालुक्यातील सोनेगाव (आबाजी) या गावातून माझे व्यक्तिमत्व विकसीत झाले. वडिलोपार्जित गाव म्हणून माझ्या लहान मनावर संस्कार झाले. सामाजिक व राजकीय धडे येथेच आपल्याला मिळाले, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम पर्यटन,......

ठळक मुद्देमदन येरावार : सोनेगाव येथील धर्मार्थ दवाखाना व रूग्णवाहिका ठरणार फायद्याची

ऑनलाईन लोकमतदेवळी : तालुक्यातील सोनेगाव (आबाजी) या गावातून माझे व्यक्तिमत्व विकसीत झाले. वडिलोपार्जित गाव म्हणून माझ्या लहान मनावर संस्कार झाले. सामाजिक व राजकीय धडे येथेच आपल्याला मिळाले, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम पर्यटन, औषध व सामान्य प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी केले.नजीकच्या सोनेगाव आबाजी येथील धर्मार्थ दवाखाना व रूग्णवाहिकेच्या लोकार्पण कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी खा. रामदास तडस होते. तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, आ. डॉ. पंकज भोयर, जि. प. शिक्षण सभापती जयश्री गफाट, पं. स. सभापती विद्या भुजाडे, जि. प. सदस्य वैशाली येरावार, भाजपाचे संपर्क प्रमुख राहुल चोपडा व महामंत्री सुनील गफाट यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.केंद्र व राज्य शासनाच्यावतीने शेतकºयांच्या हितार्थ अनेक योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. सामान्य नागरिकांच्या आरोग्याचे भान ठेवून गरजु रूग्णांच्या उपचारासाठी पाच लाखापर्यंतची शासकीय मदत देवून सामाजिक दायित्वाची भावना जोपासली जात आहे, असेही यावेळी ना. येरावार यांनी सांगितले.खासदार तडस यांनी अध्यक्षीय भाषणात येरावार कुटंूबियांचा सामाजिक वारसा तसेच सरकारच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती याप्रसंगी दिली.भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनी जयंत येरावार व कुंटुंबीयांची सामाजिक बांधिलकी तसेच शेतकऱ्यासाठी केलेल्या कार्याचा आढावा यावेळी सांगितला. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते धर्मार्थ दवाखान्याचे व रूग्णवाहिणीचे लोकार्पण करण्यात आले. या दवाखान्याचा व रुग्णवाहिकेचा परिसरातील सामान्य नागरिकांना नक्कीच फायदा होईल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. भाजपा किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयंत येरावार यांचा सपत्नीक प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला पं. स. उपसभापती किशोर गव्हाळकर, जि.प. सदस्य प्रवीण सावरकर व सुनीता राऊत, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर, संजय गाते, हाजी अब्दुल हमीद, नगरसेवक नंदू वैद्य, आबाजी महाराज देवस्थानचे अरूण दाणी, सतीश दाणी, सरपंच संगीता लोखंडे, विनायक भोयर, गंगाधर राऊत, आबाराव भोयर, श्याम कावळे, गजानन डफरे यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.