शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
6
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
7
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
8
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
9
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
10
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
11
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
12
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
13
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
14
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
15
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
16
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
17
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
18
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
19
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
20
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग

आजपर्यंत भाजपाचा आमदार निवडून न आल्याची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:03 IST

आजपर्यंत देवळी विधानसभा मतदार संघात भाजपाचा आमदार निवडून येऊ शकला नाही, याची खंत आहे; पण यावेळी भाजपाचा आमदार हेच लक्ष्य राहणार आहे.

ठळक मुद्देरामदास तडस : देवळीकरांच्यावतीने नागरी सत्कार व लाडूतुला

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : आजपर्यंत देवळी विधानसभा मतदार संघात भाजपाचा आमदार निवडून येऊ शकला नाही, याची खंत आहे; पण यावेळी भाजपाचा आमदार हेच लक्ष्य राहणार आहे. यासाठी आपसी मतभेद बाजूला सारून भाजपाचे सर्व पदाधिकारी पक्षाच्या उमेदवारासाठी एकजुटीने काम करणार असल्याचा विश्वास आहे, असे मत खा. रामदास तडस यांनी व्यक्त केले.देवळीकरांच्या वतीने आयोजित नागरी सत्कार सोहळ्याला उत्तर देताना ते बोलत होते. स्थानिक आठवडी बाजार चौकात आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वर्धा विधानसभा मतदार संघाचे आ.डॉ. पंकज भोयर तर अतिथी म्हणून हिंगणघाटचे आ. समीर कुणावार, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. गोडे, शंकरराव कापसे, जि.प. सभापती मुकेश भिसे, पं.स. सभापती विद्या भुजाडे, नगराध्यक्ष सुचिता मडावी, न.प. गटनेत्या शोभा तडस आदी उपस्थित होते. खा. तडस यांची ६५ व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त लाडूतुला करण्यात आली. याप्रसंगी वर्धा लोकसभा मतदार संघातील पक्षाचे पदाधिकारी, शोतोकॉन कराटे असोसिएशन, जि.प., पं.स., न.प. व ग्रा.पं.चे पदाधिकारी तसेच विविध सामाजिक संघटना व संस्थांच्यावतीने त्यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.खा. तडस पूढे म्हणाले की, देवळी नगर परिषदेने १५० व्या वर्षात पदार्पण केले आहे. यामुळे सात दिवसीय खासदार महोत्सवाचे आयोजन करून येथे विविध खेळांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रम तसेच नामवंतांचे आदरातिथ्य केले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आमंत्रित करून विकासाला चालना दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही समयोचित विचार व्यक्त केलेत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक न.प. उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर यांनी केले. संचालन सचिन गोडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार हरिदास ढोक यांनी मानले. कार्यक्रमाला भाजप किसान आघाडीचे अध्यक्ष जयंत येरावार, जि.प. सदस्य वैशाली येरावार, मयुरी मसराम, कराटे असोसिएशनचे अनूप कपूर, न.प. सभापती कल्पना ढोक, सारिका लाकडे, सुनीता बकाणे, सुनीता ताडाम, न.प. सदस्य, नंदू वैद्य, संगीता तराळे, संध्या कारोटकर, मिलिंद ठाकरे, मारोती मरघाडे, अ. नईम, दशरथ भुजाडे, अनिल कारोटकर, दीपक फुलकरी यांच्यासह शहरातील गणमान्य नागरिक तथा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.नवीन रेल्वे गाड्या व थांबा मिळवून देणारा पहिला लोकप्रतिनिधीवर्धा लोकसंभा मतदार संघाच्या विकासासाठी धडपडणारे विकास पुरूष म्हणून खा. तडस यांची ओळख राहिली आहे. त्यांचे नेतृत्व जोपासणे ही आपणा सर्वांची गरज ठरली आहे, असे मत आ.डॉ. भोयर यांनी व्यक्त केले. तर या जिल्ह्याला नवीन रेल्वे गाड्या व थांबे मिळवून देणारा पहिला लोकप्रतिनिधी म्हणून आ. कुणावार यांनी आपल्या भाषणातून खा. तडस यांचा गौरव केला.पुरस्कार वितरण व मान्यवरांचा सत्कारयाप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या खासदार चषक कराटे चॅम्पियनशिपचे पुरस्कार वितरण खा. रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आले. शिवाय हस्तलिखीत संविधान लिहून लिमका बुकमध्ये स्थान मिळविलेल्या धनंजय नाखले यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.