शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

नागपंचमीला सापाला पूजले जाते, मग इतर दिवशी का मारले जाते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 05:00 IST

श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. या दिवशी अनेक जण सापांची पूजा करतात. मात्र, आता फक्त सापांची पूजा करूनच चालणार नाही, तर त्यांना वाचविण्याचीही नितांत गरज आहे. यासाठी सर्वांच्या पुढाकाराची गरज आहे. साप दिसल्यानंतर तत्काळ सर्पमित्राला फोन करून बोलविले जाते. मात्र, आजही काही ठिकाणी साप दिसताच त्याला ठेचून मारले जाते. अनेक ठिकाणी गारुडी हे स्वत:चे पोट भरण्यासाठी सापांचे खेळ करतात. मात्र, खऱ्या अर्थाने सर्पमित्र हे विनामूल्य सापांचा जीव वाचवतात.

चैतन्य जोशीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : साप किंवा नाग दिसताच कोणाचाही थरकाप उडतो. दिवसेंदिवस सापांच्या संख्येत लक्षणीय घट होत चालली असल्याने पर्यावरण संवर्धन धोक्यात येत आहे.  निसर्गाच्या अन्नसाखळीत सापांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज नागपंचमी सण साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील पहिलाच सण म्हणून नागपंचमी सणाची ओळख आहे. यानंतरच सणांची रेलचेल सुरू होते. नागपंचमीला सापाला पूजले जाते. मात्र, इतर दिवशी सापाला आजही मारण्यात येत असल्याचे चित्र आहे. सापाला मारू नका तर त्याला जीवदान द्या, अशी ओरड आता सर्पमित्रांकडून केली जात आहे. श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. या दिवशी अनेक जण सापांची पूजा करतात. मात्र, आता फक्त सापांची पूजा करूनच चालणार नाही, तर त्यांना वाचविण्याचीही नितांत गरज आहे. यासाठी सर्वांच्या पुढाकाराची गरज आहे. साप दिसल्यानंतर तत्काळ सर्पमित्राला फोन करून बोलविले जाते. मात्र, आजही काही ठिकाणी साप दिसताच त्याला ठेचून मारले जाते. अनेक ठिकाणी गारुडी हे स्वत:चे पोट भरण्यासाठी सापांचे खेळ करतात. मात्र, खऱ्या अर्थाने सर्पमित्र हे विनामूल्य सापांचा जीव वाचवतात. वनविभागाच्या अनास्थेमुळे आज कुठेही सर्पमित्रांचे प्रशिक्षण अथवा जनजागृती होताना दिसून येत नाही. सर्वसामान्यांमध्ये सापांबद्दल असणारी भीती दूर करून सर्पांना जीवदान देण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी सापाला पूजले जाते. मात्र, अजूनही असे काही जण आहेत जे साप दिसताच त्याला ठेचून मारतात. सापांच्या असलेल्या विविध प्रकारच्या जाती तसेच त्यातील विषारी कोणत्या, बिनविषारी कोणत्या तसेच सापांचे निसर्गातील असलेले महत्त्व आणि सर्पदंशानंतर करण्यात येणारे प्रथमोपचार यासाठी वनविभागाने जनजागृती करण्याची गरज आहे. 

जिल्ह्यात आढळणारे सापांचे प्रकार

विषारी साप :- पटेरी मण्यार, हिरवा घोणस, पोवळा, नाग, मण्यार, घोणस, फुरसे.

बिनविषारी साप :- गजरा, धामण, वाळा, कवड्या, नानेटी, कुकरी, मांडोळ, डुरक्या घोणस, गवत्या, चुळनागील, अजगर, दिवड.

साप हा तर शेतकऱ्यांचा मित्र

सापाचे मुख्य अन्न उंदीर आहे. उंदराची प्रजनन क्षमता प्रचंड आहे. एक नर-मादी उंदराची जोडी वर्षाला ८५० पेक्षा अधिक पिलांना जन्म देते. उंदीर देशातील २५ ते ३० टक्के धान्य खातात तसेच त्यांची नासाडी करतात. अशावेळी उंदीर, घुशींच्या संख्येवर नैसर्गिकरीत्या नियंत्रण घालण्याचे काम साप करतात. त्याचप्रमाणे पाणसाप आणि झाडावरचे साप पिकांवरील छोटे कीटक खातात. त्यामुळे पिकांचे संरक्षण होते. हिरव्या पाठीच्या पाणसर्पाची पिले डासांच्या अळ्या व अंडी खातात यामुळे डासांच्या निर्मितीला आळा बसतो. साप हे शेतकऱ्यांचेच नव्हेतर, पर्यावरण संंतुलनाचेही काम करणारे सर्व मानवजातीचे मित्र आहेत. सापांच्या विषात विषारी द्रव्याप्रमाणे मानवास उपयुक्त असणारी पाटक द्रव्येपण असतात. सापांचे विष हे एक उपयुक्त औषध आहे. 

सापाला मारणाऱ्यांनो, खबरदार! 

सापांची व अन्य वन्यजीवांची हत्या करणे, त्यांच्या निवासस्थानांस हानी पोहोचविणे, त्यांची कातडी काढून विकणे वा वापरणे, त्यांना पकडणे, बंदिवासात ठेवणे, त्यांच्या अवयवांची विक्री व प्रदर्शनी करणे, तेल व अन्य औषधांकरिता अंधश्रद्धेतून त्यांची हत्या व अवयवांचा वापर करणे हे वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ व सुधारणा कायदा २००२ अन्वये गुन्हा आहे. हा गुन्हा करणाऱ्यास जास्तीतजास्त सात वर्षांपर्यंत सक्त मजुरीची शिक्षा व २५ हजार रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. 

साप आढळला तर...- साप आढळून आल्यास सर्वांत आधी त्याला डिवचू नका, तो ज्या दिशेने जात आहे त्या दिशेने त्याला जाऊ द्या, साप हा एका जागेवर फार काळ राहत नाही. - तत्काळ सर्पमित्राला फोन करून सापाबाबतची माहिती द्या, सर्पमित्र सापाला सुरक्षित पकडून जीवदान देईल. - सापाला मारू नका, त्याला जीवदान देण्यास मदत करा.

 

टॅग्स :snakeसापNag Panchamiनागपंचमी