शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पट्ट्यांसाठी झोपडपट्टीधारक धडकले जिल्हाकचेरीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 23:35 IST

जिल्ह्यातील अतिक्रमित झोपडपट्टीवासियांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतुने तसेच त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून गरीब व कष्टकरी जनतेला त्वरित पट्टे देण्याच्या मागणीकरिता....

ठळक मुद्देरिपाइं(आ.)चे निदर्शने : दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील अतिक्रमित झोपडपट्टीवासियांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतुने तसेच त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून गरीब व कष्टकरी जनतेला त्वरित पट्टे देण्याच्या मागणीकरिता रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आ.) च्या नेतृत्त्वात झोपडपट्टी धारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी झोपडपट्टी धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर करण्यात आले.गत २० ते २५ वर्षांपासून सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून झोपड्या बांधुन कौटुंबिक उदरनिर्वाह करणाºया नागरिकांना अद्याप कायमस्वरुपी पट्टे मिळालेले नाहीत. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी या आठही तालुक्यातील अनेक भागात तसेच वर्धा शहरालगत शासकीय जागेवर अतिक्रमण करून झोपडीत राहणाºयांना जागा वन विभागाची असो की, गावठाणाची; पण राहणाºयांना पट्टे देण्याचा निर्णय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.जिल्ह्यातील परसोडी, रोहणखेडा, शांतीनगर, बोरगाव (मेघे), सावंगी (मेघे), पिपरी (मेघे), म्हसाळा, सिद्धार्थनगर, चितोडा, बरबडी, सेवाग्राम, वरुड, आदर्शनगर, गौतमनगर आणि शहरातील अनेक भागातील नागरिकांना जमिनीचे कायमस्वरूपी पट्टे मिळालेले नाहीत. यामुळे अशा नागरिकांना पट्टे देण्याची मागणी करीत रिपाइं (आ.)चे जिल्हाध्यक्ष तथा जि. प. सदस्य विजय आगलावे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. निवेदनात अतिक्रमण धारक गरिब कष्टकरी जनतेला लकवरात लवकर पट्टे देण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा संघटक महेंद्र मुनेश्वर यांनी दिला. यावेळी प्रकाश पाटील, अजय मेहरा, नरेश ओंकार, सुरेंद्र पुनवटकर, देवानंद तेलतुंबडे, अ‍ॅड. राजेश थुल, विनोद वाघे, वसंत भगत, देविदास भगत, दिलीप सुखदेवे, विजय नगराळे, सतीश इंगळे, धर्मपाल शंभरकर, मोहन वनकर, देवानंद कांबळे, सुभाष कांबळे, गौतम डंभारे, प्रकाश इंगळे, माणिक ताकसांडे, संजय गवई, मुन्ना शेख, संदेश आगलावे, विजय चन्ने, महादेव तागडे, सम्यक ओंकार, राहुल गायकवाड आदींची उपस्थिती होती.