शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

काचांवर झोपून नोंदविला न.प. प्रशासनाचा निषेध

By admin | Updated: June 19, 2017 01:12 IST

येथील नगर पालिकेने विशेष मोहीम हाती घेत शहरातील विविध भागातील अतिक्रमण काढण्यास सुरूवात केली आहे.

नुकसान भरपाईची मागणी : छोट्या व्यावसायिकाचे आंदोलनलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील नगर पालिकेने विशेष मोहीम हाती घेत शहरातील विविध भागातील अतिक्रमण काढण्यास सुरूवात केली आहे. सदर कार्यवाहीला विरोध नसून कार्यवाहीच्या नावाखाली छोट्या व्यावसायिकांच्या दुकानांची तोडफोड केली जात आहे. अनेक छोट्या व्यावसायिकांचे नुकसान झाल्याने नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी अल्पोहाराची टपरी लावणाऱ्या विल्सन मोखाडे याने स्थानिक बजाज चौकात अनोखे आंदोलन सुरू केले आहे. सदर आंदोलनादरम्यान विल्सन मोखाडे याने काचांवर झोपून न.प.च्या छोट्या व्यावसायिक विरोधी धोरणाचा निषेध नोंदविला. आंदोलनादरम्यान शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनातून, रस्त्याच्या कडेला छोटी टपरी लावून विविध प्रकारचे व्यवसाय करणारे गरीब असतात. ते कुटुंबाचा उदरनिर्वाह याच व्यवसायातून करतात. आपणही टपरी लावून चायनिज खाद्य पदार्थ विक्रीच्या व्यवसायातून कुटुंबाचा गाढा ओढतो. सध्या न. प. प्रशासनातर्फे अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेला विरोध नाही. परंतु, विशेष मोहिमेच्या नावाखाली नगर पालिका प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी छोट्या व्यावसायिकांच्या दुकानांची तोडफोड करीत आहेत. आपल्या दुकानाचीही तोडफोड करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आपल्यासह नुकसानग्रस्त अन्य छोट्या व्यावसायिकांना नुकसान भरपाई देण्यात यावी किंवा त्यांच्या तोडफोड करण्यात आलेल्या दुकानांची तात्काळ दुरुस्ती करून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. आंदोलनस्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.