शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

परवानगी न घेता टॉवरसाठी शेतातील झाडांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 22:07 IST

विद्युत लाईनच्या टॉवरमुळे शेताचे नुकसान होत आहे. अत्यल्प मोबदला देत शेती खराब करण्याचे काम तालुक्यात सर्रास सुरू आहे. दिघी बोपापूर येथील फुलमाळी यांच्या शेतातही परवानगी न घेता टॉवर उभारले जात आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : संबंधित कंत्राटदारावर कार्यवाहीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : विद्युत लाईनच्या टॉवरमुळे शेताचे नुकसान होत आहे. अत्यल्प मोबदला देत शेती खराब करण्याचे काम तालुक्यात सर्रास सुरू आहे. दिघी बोपापूर येथील फुलमाळी यांच्या शेतातही परवानगी न घेता टॉवर उभारले जात आहे. यासाठी शेतातील झाडांचीही कत्तल केली आहे. याकडे लक्ष देत कंत्राटदारावर कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. याबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदनही देण्यात आले आहे.दिघी बोपापूर येथील भीमराव फुलमाळी यांची शेती त्यांचा भाऊ दिलीप यांच्या नावे आहे. शेत सर्व्हे क्र. ११० आराजी ३.६४ हे आर. वर्ग १ या शेताची उत्तर-दक्षिण विभागणी करून तोंडी वाटणी झाली. यात अंदाजे ३ एकर शेत भीमराव फुलमाळी हे वाहत आहे. सदर शेतात तूर असून शेंगा लागून आहेत. इलेक्ट्रीक टावर लाईन कंपनीने शेतकऱ्याला पूर्वसूचना न देता तथा परवानगी न घेता सदर शेतातून टावर लाईनचे काम सुरू केले आहे. यासाठी १० डिसेंबर २०१७ रोजी शेतातील अंदाजे ३० ते ४० सागाची झाडे, ३ ते ४ बोरीची झाडे, तीन ते चार गोंदणीचे झाडे बुडापासून अवैधरित्या कापलीत. शिवाय अर्ध्या एकरातील पीक नष्ट झाले. यात शेतकऱ्याचे सुमारे तीन ते पाच लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. शेतात काही तार उभे केले असून काही तार उभे करणार आहेत. यासाठी आणखी काही झाडे मनमानीपणे तोडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कापलेली झाडे व तूर पिकाचे नुकसान शेताची पाहणी केल्यास लक्षात येऊ शकते. याचा पंचनामा करून प्रत शेतकऱ्याला मिळणे गरजेचे आहे. वनविभागाने तलाठ्याच्या माध्यमातून पंचनाम करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्याने केली. कंपनीने कायदा हातात घेत परवानगी न घेता झाडे तोडून नुकसान केल्याने कार्यवाही करावी, अशी मागणीही भीमराव फुलमाळी या शेतकºयाने केली आहे.