शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

बोपापूर परिसरात वृक्षांची कत्तल

By admin | Updated: April 2, 2016 02:40 IST

नजिकच्या बोपापूर येथील शासकीय आणि वनविभागाची मालकी असलेल्या जमिनीवरील झाडांची राजरोसपणे कत्तल सुरू आहे.

वनविभागाचे दुर्लक्ष : अनेक शेतकऱ्यांनी केले अतिक्रमणपोहणा : नजिकच्या बोपापूर येथील शासकीय आणि वनविभागाची मालकी असलेल्या जमिनीवरील झाडांची राजरोसपणे कत्तल सुरू आहे. जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणही होत आहे. त्यामुळे निसर्गाचे दोहन होत आहे. ४० एकर शासकीय जमिंनीची कागदोपत्री नोंद तेवढी बाकी आहे. बोपापूर गावालगतच सरकारी मालकीची १५.४५ हेक्टर जमीन आहे. त्यापैकी वनविभागाला ८.५५ हेक्टर जमिनीचे हस्तांतरण करण्यात आले. सदर जमिनीवर गेल्या काही वर्षापर्यंत वनराई फुललेली दिसत होती. परंतु महसूल विभाग आणि वनविभागाच्या दुर्लक्षतेमुळे या जमिनीवरील मोठ-मोठ्या वृक्षांची कत्तल करून अनेक शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून जमीन ताब्यात घेतली आहे.गावालगतच या जमिनीच्या मध्यभागातून एक नाला गेला आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत बोपापूर गावाची निवड झाल्याने सध्या या नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे आपल्या सोयीप्रमाणे नाल्याला अनेक ठिकाणी वळणे देवून नाल्यापर्यंत शेतजमिनीवर अतिक्रमण वाढत चालले आहे. वास्तविक पाहता महसूल आणि वनविभागाने आपल्या मालकीची जमीन ताब्यात घेणे गरजेचे होते. परंतु महसूल व वनविभाग अनभिज्ञ असल्याने जवळ-जवळ ४० एकर जमीन असताना सुद्धा ती अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे. एकीकडे शासन ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा नारा देत वृक्षलागडीकडे विशेष भर आहे. परंतु वनविभागाकडे मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध असताना सुद्धा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. या जमिनीची मोजणी करून वृक्षारोपण करणे गरजेचे आहे.(वार्ताहर)