शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाच्या जागेवरील डेरेदार सागांची कत्तल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2022 21:55 IST

पारडी दक्षिण बिटातील सर्वे क्रं. ६८ झुडपी जंगल माैजा पारडीमध्ये दिवसाढवळ्या  मोठ्या प्रमाणावर सागवानाची अवैधरित्या तोड करण्यात आली. लाकूड तस्कर अन् वनविभागाच्या अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्याने तसेच वनविभागाच्या ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्षामुळेच हा प्रकार झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश देणारा वनविभाग लाकूड तस्करांना समर्पित तर झाला नाही ना, असा प्रश्नही वृक्षप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.

प्रमोद भोजणेलोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : विविध प्रजातींच्या वनसंपदेने नटलेल्या तळेगाव वनपरिक्षेत्रात सध्या अवैध वृक्ष कत्तलीला उधाणच आले आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणांमुळे मौल्यवान समजल्या जाणारी साग प्रजातींची डेरेदार झाडे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांकडून भुईसपाटच केली जात आहेत.विशेष म्हणजे म्हणजे पारडी (हेटी) भागातील वनविभागाच्या जागेवरील डेरेदार सागाच्या झाडांची भरदिवसा तोड करण्यात आली; पण तळेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी उंटावरून शेळ्या हाकलण्यात धन्यता मानत असल्याने त्यांच्या कार्यप्रणाली विषयी परिसरातील वृक्षप्रेमींकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तळेगांव वनपरिक्षेत्रातील सहवनक्षेत्र पारडी नियतक्षेत्र पारडी दक्षिण बिटातील सर्वे क्रं. ६८ झुडपी जंगल माैजा पारडीमध्ये दिवसाढवळ्या  मोठ्या प्रमाणावर सागवानाची अवैधरित्या तोड करण्यात आली. लाकूड तस्कर अन् वनविभागाच्या अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्याने तसेच वनविभागाच्या ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्षामुळेच हा प्रकार झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश देणारा वनविभाग लाकूड तस्करांना समर्पित तर झाला नाही ना, असा प्रश्नही वृक्षप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.

नाममात्र कारवाई करून अधिकाऱ्यांकडून थोपटून घेतली जातेय पाठ- तळेगांव वनपरिक्षेत्रातील सहवनक्षेत्र पारडी नियतक्षेत्र पारडी दक्षिण बिटातील सर्वे क्रं. ६८ झुडपी जंगल माैजा पारडी  येथील अवैध वृक्षतोड करून साठवणूक करण्यात आलेला ३ मीटर २६१ घनमीटर साग लाकूड जप्त करण्यात आला आहे. ज्या प्रमाणात अवैध वृक्षतोड करून डेरेदार सागाची चोरी करण्यात आली त्याच्या तुलनेत ही कारवाई नाममात्रच ठरणारी आहे; पण कारवाई करून तळेगावचे अधिकारी स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. जप्त करण्यात आलेला लाकूड एक लाख रुपये किमतीचा असल्याचे सांगण्यात आले.

साधे सर्वेक्षणही नाही- वनविभागाच्या जागेवरील डेरेदार सागाच्या वृक्षांची मनमर्जीने तोड करण्यात आली असली तरी तळेगाव वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून साधे सर्वेक्षणही करण्यात आलेले नाही. अधिकारी मूग गिळून असल्याने जिल्हा स्थळावरील बड्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी तातडीने लक्ष देत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आहे.

३ नोव्हेंबरला तळेगाव वनपरिक्षेत्रातील सहवनक्षेत्र पारडी नियतक्षेत्र पारडी दक्षिण बिटातील सर्व्हे क्र. ६८ झुडपी जंगल माैजा पारडीमध्ये अवैध सागवान झाडाची कटाई झाल्याचे दिसून आले. त्याबाबत शोध घेतला असता  शेजारील कुलदीप सीरस्कार यांनी मालकी खसरा खरेदी करून साग झाडाची कटाई केली. संबंधित लाकडात अवैध तोडलेला लाकूड मिसळून वाहतूक करणार असल्याच्या तयारीत असताना आरोपीस पकडून अवैध कटाई केलेला माल जप्त केला आहे. शिवाय आरोपीविरुद्ध वन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.- विजय सूर्यवंशी, वनपरिक्षेत्र अधिकारी, तळेगाव (श्या.पंत.).

 

टॅग्स :forest departmentवनविभाग