शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

परवानगीचा अनर्थ काढून शेकडो झाडांची कत्तल

By admin | Updated: January 24, 2016 01:55 IST

आर्वी ते पुलगाव मार्गावरील रोहणा ते सोरटा दरम्यान रहदारीला अडथळा होत असल्याच्या कारणावरून १६ बाभळीच्या ...

कंत्राटदाराचा प्रताप : बांधकाम विभागाने केले काम बंदरोहणा : आर्वी ते पुलगाव मार्गावरील रोहणा ते सोरटा दरम्यान रहदारीला अडथळा होत असल्याच्या कारणावरून १६ बाभळीच्या झाडांच्या फांद्या तोडण्याची परवानगी खासगी कंत्राटदाराला देण्यात आली; पण कंत्राटदाराने पत्रावर खोडतोड करीत ४६ नमूद केले. प्रत्यक्षात फांद्या कापण्याऐवजी शेकडो झाडांचीच सर्रास कत्तल करण्यात आली. रोहणा ते सोरटा या १० किमी अंतराचा वनपरिक्षेत्र अधिकारी आर्वी यांनी सर्व्हे केला. यात रहदारीस अडथळा ठरणारी १६ झाडांच्या फांद्या तोडण्याची व त्याच्या मुल्यांकनाची माहिती सहा. अभियंता श्रेणी १, सार्वजनिक बांधकाम उपविभाग पुलगाव यांना १६ जानेवारी रोजी दिली. त्यानुसार बांधकाम विभागाने खासगी कंत्राटदाराला ९१ ते १५० गोताईची १५ तर १५० च्या वर गोताईचे १ झाड, असे बाभुळ जातीच्या १६ झाडांच्या फांद्या तोडण्याची परवानगी दिली. यात कंत्राटदाराने चलाखी करून वनपरिक्षेत्र अधिकारी आर्वी यांनी दिलेल्या पत्रात खोडतोन करीत १६ चे ४६ केले. प्रत्यक्षात त्यांनी यापेक्षा कित्येक पट अधिक झाडेच तोडलीत. पर्यावरणाच्या रक्षणासाठी झाडे लावा झाडे जगवा, शतकोटी झाडे लागवड योजना, एक मूल एक झाड या योजना राबवून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. जंगल व झाडे संवर्धनाचा शासनाचा धडक कार्यक्रम असताना खासगी कंत्राटदार आर्थिक स्वार्थासाठी सर्रास झाडांची कत्तल करीत आहे. यावर ज्यांनी नियंत्रण ठेवावे, अशी शासनाची अपेक्षा आहे, त्यांचे दुर्लक्ष होत आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग पुलगाव यांनी १६ झाडांची परवानगी दिली असून कंत्राटदाराने तेवढीच झाडे तोडावी, यावर लक्ष ठेवणारी सश्रम यंत्रणा असणे गरजेचे आहे; पण खासगी कंत्राटदारावर लक्ष नसल्याने त्यांचे फावत आहे. यातून शासनाच्या योजनांना सुरूंग लागत आहे.(वार्ताहर)