शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

स्लॅब लीक; संगणकाला प्लास्टिकचे संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 01:00 IST

उप-डाकघर असलेल्या इमारतीचा स्लॅब लिक आहे. यामुळे पावसाचे पाणी थेट संगणकांवर झिरपते. पाण्यामुळे संगणक खराब होऊ नये, कामात व्यत्यय येऊ नये म्हणून अनोखे जुगाड करण्यात आले आहे.

ठळक मुद्देउप-डाकघरातील ‘जुगाड’ : वरिष्ठांना माहिती देऊनही दुरूस्तीकडे कानाडोळा

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : उप-डाकघर असलेल्या इमारतीचा स्लॅब लिक आहे. यामुळे पावसाचे पाणी थेट संगणकांवर झिरपते. पाण्यामुळे संगणक खराब होऊ नये, कामात व्यत्यय येऊ नये म्हणून अनोखे जुगाड करण्यात आले आहे. संगणक यंत्रणेच्या संरक्षणासाठी प्लास्टिकच्या छताचीच व्यवस्था करण्यात आली आहे. येथे येणाºया नागरिकांना हे दृश्य पाहून आश्चर्य झाल्याखेरीज राहत नाही.आश्रम मार्गावर भारतीय डाक व तार कार्यालयाचे उप-डाकघर आहे. इमारत भव्य आणि सुसज्ज आहे. सर्व प्रकारची व्यवस्था असून आधुनिक आणि गतिमान कार्यासाठी संगणकीय व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सेवाग्राम आणि परिसरातील डाकघराचा कार्यालयीन व्यवहार तथा दवाखाना, महाविद्यालय, संस्था यांचा पसारा मोठा असल्याने महत्त्वपूर्ण देवाण-घेवाण या उप-डाकघरातून होत असते. या इमारतीचे भूमिपूजन आॅगस्ट १९७३ मध्ये झाले. कार्यालयातील संगणक यंत्राच्या वरील स्लबमधून पावसाळ्यात पाणी झिरपते. सर्व व्यवहार संगणकावरच होत असल्याने धोका होण्याची शक्यता होती. ही बाब टाळण्यासाठी चक्क त्यावर प्लास्टिकची झोपडीच करण्यात आले आहे. या माध्यमातून संगणक यंत्रणा आणि टेबलाचे संरक्षण करण्यात आले आहे.या कार्यालयात दोन संगणक असून त्यांना प्लास्टिकचे कवच देण्याची वेळ कार्यालयावर आल्याचे दिसून येते. इमारतीचा स्लॅब लिक असल्याची बाब वरिष्ठांना कळविण्यात आली आहे; पण अद्यापही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. परिणामी, तेथील कर्मचाºयांना जुगाड करीत संगणकाला संरक्षण द्यावे लागत असल्याचे दिसून येत आहे.अपघाताचाही धोकाउप-डाकघराच्या इमारतीचा स्लॅब लिक आहे. यामुळे पावसाचे पाणी थेट संगणकावर झिरपते. यामुळे संगणक खराब होऊन कामे ठप्प होण्याची तथा रेकॉर्ड नष्ट होण्याचा धोका आहे. शिवाय संगणकावर पाणी पडून त्यात जिवंत वीज प्रवाहित होऊन अपघात होण्याचा धोका आहे. यामुळे ही बाब गंभीरतेने घेत दुरूस्ती करणे गरजेचे आहे.