शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

एनआरएचएम आणि आरकेएसमधून लिपिकांना वगळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:43 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या लिपीक वर्गीय कर्मचाºयांना एनआरएचएम व आरकेएसची कामे देण्यात येत आहे.

ठळक मुद्देजि.प. लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे डीएचओंना साकडे : चर्चेअंती पत्रक काढण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या लिपीक वर्गीय कर्मचाºयांना एनआरएचएम व आरकेएसची कामे देण्यात येत आहे. या कामातून अनेक प्रकारचे घोळ निर्माण झाले असून त्याला सर्वस्वी जबाबदार लिपीक वर्गीय कर्मचाºयांना धरल्या जात आहे. यामुळे त्यांना या कामातून वगळण्यात यावे अशी मागणी संघटनेच्यावतीने गुरुवारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना करण्यात आली आहे.यावेळी झालेल्या चर्चेतून आरोग्य अधिकाºयांनी लिपीकांना आरकेएसच्या कामातून वगळण्यात येईल या आशयाचे पत्र काढण्याचे आश्वासन दिले. मात्र कर्मचाºयांना एनआरएचएमची कामे करावी लागतील असे आरोग्य अधिकाºयांनी सांगितले.या चर्चेदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेचा दाखलाही देण्यात आला. या चर्चेमध्ये झालेल्या निर्णयानुसारच सदर परिपत्रक काढण्यात येणार असल्याचे आरोग्य अधिकाºयांनी कळविले. या चर्चेला संघटनेचे उपाध्यक्ष हेमंत भोयर, महिला उपाध्यक्ष निलीमा उगेमुगे, सचिव बाळा घारड यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाºयांची उपस्थिती होती. यावेळी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.औषध खरेदीच्या कामात गोंधळाचा आरोपकाही प्राथमिक आरोग्य केंद्रात काही वैद्यकीय अधिकाºयांकडून आवश्यकतेनुसार औषधी खरेदी होते. त्याची देयके या लिपीकाकडे देण्यात येतात. यात कधी औषधसाठा खरेदी न होताही देयक सादर करून लिपीकाला ती खतविण्याकरिता धमकावणी होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. याला आळा घालण्याची मागणीही त्यांच्याकडून जिल्हा आरोग्य अधिकाºयांना करण्यात आली. यावर डिएचओ डॉ. डवले यांनी असा प्रकार घडल्यास थेट माझ्याकडे तक्रार करा असा सल्ला दिला.