शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

विघ्नहर्त्याच्या मूर्तीला तिसरी पिढी देतेय आकार

By admin | Updated: August 12, 2014 00:06 IST

मराठी माणसाचे लाडके दैवत विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाला केवळ १५ दिवस राहिलेत़ पावसाचा लहरीपणा, उन्ह-पावसाचा लपंडाव, मूर्ती बनविण्यासाठी लागणारी माती, रंग व अन्य साहित्य याची भाववाढ,

प्रभाकर शहाकार - पुलगावमराठी माणसाचे लाडके दैवत विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाला केवळ १५ दिवस राहिलेत़ पावसाचा लहरीपणा, उन्ह-पावसाचा लपंडाव, मूर्ती बनविण्यासाठी लागणारी माती, रंग व अन्य साहित्य याची भाववाढ, मजुरीचे वाढते दर आणि काही भागात दुष्काळी स्थिती या चौफेर समस्या व महागाईच्या सावटात श्रीगणेश यंदा चांगलेच अडकलेत! यंदा गणेश मुर्तीच्या किमती ५० टक्के वाढणार असल्याचे दिसत आहे़एकेकाळी प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या पुलगावच्या गणेशोत्सवात गणेशमूर्तीच्या विक्रीतून सुमारे ७० लाखांची आर्थिक उलाढाल होत असे़ हिंगणघाटफैल येथील कुंभारपुऱ्यात सुमारे १३ ठिकाणी गणेशाच्या मूर्ती साकारण्याचे काम जोमाने सुरू आहे़ मूर्तीकार अरुण गाते यांच्या कुटुंबाची तिसरी पिढी सध्या गणेश मूर्त्या साकारत आहे़ आदित्य व गणेश ही भावंडे विघ्नहर्त्या गणेशाच्या मूर्ती घडविण्याचा वारसा ८० वर्षानंतरही कायम ठेवून आहे़ पुलगाव कॉटन मिलच्या वैभवशाली गणेशोत्सवाची परंपरा विद्यमान प्रशासनाच्या धोरणामुळे खंडित झाली असली तरी पुलगावकरांचे गणेशोत्सवाचे सातत्य कायम आहे़ शहरात जवळपास ३५-४० तर ग्रामीण भागात ४०-४५ अशी ९०-९५ सार्वजनिक गणेश मंडळे कार्यरत आहे़ या मंगलमय पर्वासाठी शहरात पुणे, नागपूर, अमरावती, वर्धा, धामणगाव येथील एकापेक्षा एक सरस गणेशमूर्त्या भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडतात़ नामवंत मूर्तीकार नागोराव इंगळे यांचे पुत्र सुरेश इंगळे व वारसाहक्काने तिसऱ्या पिढीतील नातू निखील व स्वप्नील तसेच सुरेश ठाकूर, प्रजापती, बबलू राठोड ही मूर्तीकार मंडळीही ५० वर्षांपेक्षा अधिक काळापासून गणेश मूर्ती साकारीत आहे़ दहा वर्षांपासून कुंभारपुऱ्यातील गाते परिवारातील संजय गाते, पवन गाते, दिलीप गाते, उत्तम पातर, नामदेव करवाडे, गणेश वालदे, बिसन पडवार अशी १५-२० कुटुंबे गणेशमूर्ती तयार करण्याचे काम करीत आहे़ हिंगणघाटफैल येथील रामचंद्र गाते यांनी ८० वर्षांपूर्वी गणशेमूर्तीचा व्यवसाय सुरू केला़ त्यानंतर आदित्य व गणेश ही भावंडे मूर्ती साकारण्याचा पिढीजात वारसा जोपासत आहे़ शासनाने प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्तीवर बंधन टाकल्याने आता मूर्ती चॉक मातीच्या बनविल्या जात आहे़ माती व साहित्याचे दर वाढले असून गोल्डन रंगाची किंमत वाढली़ ३ हजार रुपयांत मिळणारा डबा ४ हजार ५०० रुपये तर एशियन रंगाच्या किमतीत झालेली वाढ, मजुरीचे वाढते दर यामुळे यंदा गणेशाच्या मूर्ती महाग होईल़ वाढत्या महागाईमुळे मूर्तीच्या किमतीत जवळपास ५० ते ६० टक्के वाढ होणार आहे़ दुष्काळग्रस्त परिस्थितीने या व्यवसायावरही मंदीची लाट येऊ शकते, अशी खंत निखील इंगळे यांनी व्यक्त केली़स्थानिक मुर्तीसह वर्धा, बडनेरा, धामणगाव, अमरावती, तळेगाव येथून गणेश मूर्ती विक्रीसाठी येतात़ या काळात गणेश मूर्ती व्यवसायातून किमान ७० ते ८० लाखांची आर्थिक उलाढाल होते़ यामुळे किमान १०० ते १५० बेरोजगारांना काम मिळते तर १८-२० कुटुंबाचा वर्षभराचा गाडा चालतो़ स्थानिक मूर्तीकार कलात्मक मूर्ती साकारत असल्याने अनेक मंडळांतून ही कला प्रदर्शित होणार आहे़