शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेतील सहा मंदिरे केली जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासकीय जागेत अतिक्रमण करून बांधण्यात आलेली वर्धा शहरातील एकूण सहा मंदिरे गुरुवारी पालिकेने राबविलेल्या मोहिमेत जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईमुळे शासकीय जागेत मंदिरे बाधून जागा काबीज करणाºयांवर वचक बसला आहे.स्थानिक नगरपालिकेच्या विशेष पथकाने आज शहरातील काही भागात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान पालिका कर्मचाऱ्यांनी सायंकाळी ...

ठळक मुद्देपालिकेची कारवाई : नोटीस बजावूनही मंदिरे होती कायम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासकीय जागेत अतिक्रमण करून बांधण्यात आलेली वर्धा शहरातील एकूण सहा मंदिरे गुरुवारी पालिकेने राबविलेल्या मोहिमेत जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईमुळे शासकीय जागेत मंदिरे बाधून जागा काबीज करणाºयांवर वचक बसला आहे.स्थानिक नगरपालिकेच्या विशेष पथकाने आज शहरातील काही भागात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान पालिका कर्मचाऱ्यांनी सायंकाळी उशिरापर्यंत शासकीय जागेवर अतिक्रमण करून बांधलेली मंदिरे तोडली. पालिकेच्या पथकाने आज दुपारपासून मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे व प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. प्रारंभी पालिका कर्मचाºयांनी आरती चौक भागातील शासकीय जागेवर असलेले मंदिर जमीनदोस्त केले. त्यानंतर पालिका कर्मचाºयांनी आपला मोर्चा शिवाजी चौक मार्गे गोंड प्लॉट परिसराकडे वळविला. त्यानंतर केळकरवाडी भागात शासकीय जागेवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेले तीन मंदिर, गांधी नगर भागातील तीन मंदिर व आर्वी नाका भागातील एक मंदिर यावेळी तोडण्यात आले.शहरातील शासकीय जागेवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या मंदिरावर न.प. च्यावतीने काही दिवसांपूर्वी नोटीस लावण्यात आले होते. त्यात नोटीसमध्ये मंदिर व्यवस्थापन समितीला काही सूचना पालिकेच्यावतीने करण्यात आल्या होत्या. त्या सूचनेकडे पाठ दाखविण्यात आल्याने अखरे आज पालिकेच्यावतीने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.इतर अतिक्रमणांकडेही लक्ष देण्याची मागणीवर्धा शहरात शासकीय जागेवर मंदिर बांधून त्याच्या आधारे अनेकांनी मोठी आणि मोक्याची जागा हडपल्याचे दिसून आले आहे. यात वर्धेतील मुख्य मार्ग असो वा इतर वॉर्डातील काही भाग असो, या मंदिराच्या आधाराने अनेकांचे अतिक्रमण आहे. पालिकेच्यावतीने आज आठ मंदिरे पाडण्यात आली. मंदिराच्या आधाराने असलेले अतिक्रमण उघडे करण्याकरिता पालिकेने या मंदिराकडेही लक्ष देण्याची मागणी होत आहे.