शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

एकाच रात्री फोडली सहा दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 21:21 IST

चोरट्यांनी एकाच रात्री तब्बल सहा दुकाने फोडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी दोन मेडिकल, गॅस एजन्सीसह अन्य तीन दुकानांचे शटर कापून चोरीचा प्रयत्न केला. यातील तीन दुकानांतून ५५ हजार रुपयांची रोख लंपास करण्यात आली.

ठळक मुद्देशहर हादरले : तीन दुकानांतून ५५ हजारांची रोख पळविली, पोलिसांपुढे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : चोरट्यांनी एकाच रात्री तब्बल सहा दुकाने फोडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी दोन मेडिकल, गॅस एजन्सीसह अन्य तीन दुकानांचे शटर कापून चोरीचा प्रयत्न केला. यातील तीन दुकानांतून ५५ हजार रुपयांची रोख लंपास करण्यात आली. चोरीच्या या घटनांमुळे व्यापारी व नागरिक चांगलेच हादरले आहेत. एकाच वेळी सहा दुकानांत चोरीचा प्रयत्न झाल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.शहरातील बढे चौक परिसरातील तीन दुकानांची कुलपे तोडलेली, तर शटर कापून उघडे केलेले आढळून येताच नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. याविषयी माहिती मिळताच संबंधित दुकानांचे संचालक आणि पोलिसही घटनास्थळी पोहोचले. चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास प्रवीण राजेश धांदे रा. मालगुजारीपुरा यांच्या मालकीच्या शांती मेडिकल फोडून गल्ल्यातील रोख ४ हजार ७०० रुपये लंपास केले. यानंतर विठ्ठल मंदिरालगतच्या श्री साई मेडिकलचे शटर कापून ४७ हजार रुपये लांबविले. हे दुकान विवेक रामदास ढगे, रा. गजानननगरी, नागपूर रोड यांच्या मालकीचे आहे. तसेच बढे चौक येथील जयरमेश खुबचंदानी यांच्या मालकीच्या बाबूजी मोबाईल शॉपीमधून रोख ५ हजार रुपये चोरून नेले. या प्रकरणी विवेक ढगे आणि प्रवीण धांदे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी घटनेची नोंद केली. घटनास्थळ गाठत पंचनामा केला. श्वानपथक आणि ठसेतज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते.पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्हमागील काही दिवसांपासून शहरात आणि लगतच्या भागात गस्त बंद असल्याचे सांगण्यात येते. यामुळे भुरट्या चोरीच्या घटना घडत असतानाच सोमवारी रात्री चोरीच्या तब्बल सहा घटना घडल्याने पोलिस प्रशासनाच्या कार्यप्रणालीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ‘ते’ वाहन कैदचोरीकरिता वापरण्यात आलेले चारचाकी वाहन न्यू इंग्लिश परिसर आणि मालगुजारीपुरा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेºयांमध्ये बंद झाले आहे. घटनांतील चोरटे अट्टल असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.चोरट्यांनी नागरी वस्तीनंतर बाजारपेठेकडे वळविला मोर्चाबाजारपेठेतील या घटनांपूर्वी चोरट्यांनी न्यू इंग्लिश हायस्कूल मार्गालगतच्या दोन दुकानांमध्ये चोरीचा प्रयत्न केला. परिसरातील बोंबटकर कृषी सेवा केंद्र, विजय उके, रा. मोहिनीनगर यांच्या मालकीच्या बॅटरीच्या दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. मात्र, काहीच हाती न लागल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा बाजारपेठेकडे वळविला. त्यानंतर सावंगी मार्गावरील देवळी नाका येथील न्यू इब्राहिमजी गॅस एजन्सीला लक्ष्य केले. मात्र, येथेही चोरट्यांच्या काहीच हाती लागले नाही.