शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंगप्रकरणी सहा महिने कारावास

By admin | Updated: July 9, 2015 02:08 IST

विनयभंगप्रकरणी वसंता बापुराव मोहर्ले (६०) रा. हिंगणी, तह. सेलू जि. वर्धा या आरोपीला कलम ३५४ अंतर्गत सहा महिने कठोर कारावास ...

वर्धा : विनयभंगप्रकरणी वसंता बापुराव मोहर्ले (६०) रा. हिंगणी, तह. सेलू जि. वर्धा या आरोपीला कलम ३५४ अंतर्गत सहा महिने कठोर कारावास तसेच हजार रुपये दंडाची शिक्षा समीर डकर जिल्हा न्यायाधीश - २, वर्धा यांनी सुनावली.१० जानेवारी २०१३ रोजी संध्याकाळी ४ वाजताच्या दरम्यान आरोपी वसंता मोहर्ले याने एका २० वर्षीय महिलेला जळावू लाकूड देण्याचे आमिष देवून पोकळे यांच्या शेताजवळील नाल्याकडे नेले व तिचा विनयभंग केला. घटनेची तक्रार दुसऱ्या दिवशी पीडितेने सेलू पोलीस स्टेशन येथे नोंदविली. तक्रारीच्या आधारे वसंता मोहर्ले विरुद्ध कलम ३७६, ५११, ३२३, ५०६ अंतर्गत गुन्हा नोंदविला. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक एल. के. हांडे यांनी केला व तपासाअंती आरोपीविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.सरकारी वकील अनुराधा सबाने यांनी घटना सिद्ध करण्यासाठी एकूण सहा साक्षदार तपासले व युक्तीवाद केला. साक्षी पुराव्यांच्या आधारे तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत लक्षात घेता न्यायाधीश यांनी मोहर्ले यास सहा महिने कठोर कारावास तसेच हजार रुपये दंडा ठोठावला.(शहर प्रतिनिधी)धनादेश अनादरप्रकरणी १८ महिने कारावासश्रीराम सिटी युनियन फायनान्स शाखा वर्धाला फसवणाऱ्या आरोपीस धनादेश अनादर प्रकरणी १८ महिने कारावास आणि ३ लाख ७५ हजार रुपयाचा दंड सहावे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अमोलकुमार देशपांडे यांनी ठोठावला. मोहन अशोकराव ठाकरे याच्या विरूद्ध दाखल केलेल्या धनादेश अनादर प्रकरणी हा आदेश दिला.मोहन ठाकरे रा. वर्धा याने ट्रॅक्टर खरेदीसाठी फिर्यादी कंपनी श्रीराम सिटी युनियन फायनान्स लि. च्या वर्धा शाखेतून २ लाख ५० हजार रुपये कर्ज घेतले होते. सदर कर्जाची परतफेड करण्याकरिता ठाकरे याने फिर्यादी कंपनीस ३ लाख ७० हजार ५२८ रुपयांचा धनादेश दिला. सदर धनादेश कंपनीने वटविण्यासाठी बँकेत टाकला असता ठाकरे याच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो अनादरित झाला. त्यानंतर फिर्यादी कंपनीने धनादेश अनादरित झाल्याबाबत आरोपी विरूद्ध प्रकरण न्यायालयात दाखल केले. सदर प्रकरणात फिर्यादी कंपनीद्वारे तीन साक्षदार तपासण्यात आले. दोन्ही पक्षाकडून दाखल साक्षपुरावे आणि कागदपत्रांच्या आधारे मोहन ठाकरे याला दोषी ठरवून सदर दंड व शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास पुन्हा सहा महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षाही देण्यात आली. या प्रकरणात फिर्यादी कंपनीतर्फे अ‍ॅड. अमोल कोटंबकर यांनी काम पाहिले.