शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
2
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला"; जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी
3
Netherlands vs Sri Lanka : वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच मोठा उलटफेर; नेदरलँड्सने श्रीलंकेचा उडवला धुव्वा
4
Fact Check : बीबीसीचा 'हा' व्हिडीओ २०२४ च्या निवडणुकीतील नाही; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
5
"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान
6
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी
7
'त्या' घटनेनंतर पुन्हा एक अब्जाधीश टायटॅनिकचे अवशेष पाहायला जाणार; जाणून घ्या कोण आहेत?
8
"...अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार"
9
लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकल्यास रॉकेट बनतील 'हे' 'Modi Stocks', होऊ शकते बंपर वाढ
10
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, हिंदाल्को-पॉवरग्रिडमध्ये तेजी; IT-बँकिंग शेअर्स घसरले
11
तलावाच्या खोदकामात JCB च्या खोऱ्यात अडकलं पोतं; उघडून पाहताच पैशाचं घबाड
12
Fact Check : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य'
13
"तुम्हाला जमत नसेल तर गृहखातं माझ्याकडे द्या’’, सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला 
14
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
15
T20 World Cup 2024 : ...म्हणून यंदाही भारताचाच दबदबा; IND vs PAK मध्ये टीम इंडिया ठरू शकते वरचढ
16
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
17
"नरेंद्र मोदी आपले निवृत्त जीवन...", पंतप्रधानांच्या दौऱ्यावर जयराम रमेश यांची खोचक टीका
18
३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगणाऱ्यांची होणार चौकशी; पुणे अपघात प्रकरणात सरकारचा निर्णय
19
राज्यातील १०४७ पोलिसांना मतदान करण्याची परवानगी द्या, खासदाराची निवडणूक आयोगाला विनंती
20
'या' आलिशान क्रूझवर होतेय अनंत-राधिका यांची प्री वेडिंग सेरेमनी; किंमत, खासियत पाहून व्हाल अवाक्

जादूटोणा केल्याच्या कारणावरून डोक्यावर दगड टाकल्याच्या प्रकरणात आरोपीस सहा महिन्यांचा तुरुंगवास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 7:07 PM

जादूटोणा केला असल्याच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत आरोपीं बेबी शेषराव लोणकर व शेषराव श्रीधर लोणकर या दोघांनाही सहा महिन्यांचा कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली

हिंगणघाट ( वर्धा ) : जादूटोणा केला असल्याच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत आरोपीं बेबी शेषराव लोणकर व शेषराव श्रीधर लोणकर या दोघांनाही सहा महिन्यांचा कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली . शहरातील माता मंदिर वॉर्ड येथे दिनांक १६ जुलै २०१६ रोजी  महिलेस डोक्यावर दगड मारून गंभीर जखमी केल्याची घटना  घडली होती . या प्रकरणात दोषी बेबी शेषराव लोणकर वय ३५ व शेषराव श्रीधर लोणकर वय ४० यांना हिंगणघाट येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी सीमा लाडसे यांनी सहा महिन्यांचा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. १४ जुलै २०१६ रोजी सायंकाळी ५ वाजल्याच्या दरम्यान माझ्या अंगणात निंबु मिरची का टाकली या विषयावरून जया शरद कारवटकर यांचे सोबत बेबी लोणकर व शेषराव लोणकर यांचा वाद झाला .

वादा दरम्यान बेबी लोणकर ने जयाला पकडून ठेवले तसेच शेषराव लोणकर यांनी  आवारातील दगड उचलून जयाच्या डोक्यावर मारला . यात जया गंभीर जखमी झाली . जया कारवटकर च्या तक्रारीवरून हिंगणघाट पोलिसानी गुन्हा नोंदविला व तपास करन प्रकरण न्यायालयात ठेवले . सरकारी अभियोक्ता सचिन गावडे यांनी फिर्यादीसह एकूण सात आरोपी तपासले. या प्रकरणाची पैरवी   सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गेडाम यांनी केली .