शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांसाठी सहा लाखांचे साहित्य रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 23:48 IST

सांगली, कोल्हापूर आदी ठिकाणी पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. याच पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहन विविध सामाजिक संघटनांनी केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल सहा लाख रुपये किंमतीचे जीवनावश्यक साहित्य पुरग्रस्तांसाठी पाठविण्यात आले आहे.

ठळक मुद्देसामाजिक संघटनांच्या आवाहनाला वर्धेकरांचा प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सांगली, कोल्हापूर आदी ठिकाणी पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. याच पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहन विविध सामाजिक संघटनांनी केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल सहा लाख रुपये किंमतीचे जीवनावश्यक साहित्य पुरग्रस्तांसाठी पाठविण्यात आले आहे.पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी जिल्ह्यातून बरेच लोक, सामाजिक दायित्वातून पुढे आले. यात मराठा सेवा संघ, वर्धा सोशल फोरम, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, सेवा निवृत्त अभियंता संघटना, संभाजी ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, जिजाऊ ब्रिगेड आदींचा समावेश आहे. विविध सामाजिक संघटनांच्यावतीने ११ आॅगस्टला स्थानिक आर्वी नाका चौकातून मदत फेरी काढण्यात आली होती. यादरम्यान धान्य, कपडे, औषधी तसेच जीवनोपयोगी साहित्य व रोख स्वरूपात ३७ हजार ९३९ रुपये मदत प्राप्त झाली. तर संभाजी ब्रिगेड कामगार युनियन सेवाग्राम व सेवाग्राम मित्र परिवार यांनी १३ हजार ३०० रुपये रोख, आशिष खंडागळे व संकेत जाचक यांनी १२ हजार ७१० रुपयांची मदत केली. एकूण ६७ हजार ६९९ रुपयांची रोख रक्कम व दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था तसेच वर्धा सोशल फोरम यांच्या माध्यमातून तीन लाख रुपये किमतीची औषधी, मराठा सेवा संघ व लोकवर्गणीतून जमा रकमेतून एकूण ६० हजार रुपये किंमतीचे जनावरांसाठीचे औषध, कपडे, दैनंदिन वापराचे साहित्य गोळा झाले होते. ते साहित्य पुरग्रस्तांसाठी पाठविण्यात आले आहे. सदर उपक्रमासाठी राजू वानखेडे, सुधीर गिºहे, संजय इंगळे, अ‍ॅड. अरुण येवले, अजय मोहोड, सुधीर सगणे, दीपक कदम, विलास कडू, दिनेश काळे, सचिन राऊत, संजय शेळके, सुशांत वानखेडे, पंकज अडेकर, मनोज महाजन, विश्वजीत सेंदुरसे, अजय ठाकरे, विजय कोंबे, गजानन बुरांडे, विवेक बुरघाटे, मंगेश विधळे, सौरभ राऊत, अशोक वेले, निखिल ठाकरे, सौरभ राऊत, मंगेश घुंगरूड, प्रशांत बावणे, कपिल गोडघाटे, नीरज बुटे, अमोल वांदिले, योगिता इंगळे, पूजा जाधव, वंदना गावंडे, संगीता जुमडे आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :floodपूर