शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सहा कर्मचारी अडकले लिफ्टमध्ये

By admin | Updated: January 24, 2017 02:22 IST

हस्तांतरित न झालेल्या आणि लिफ्ट वापरू नये, अशी सूचना नसलेल्या लिफ्टमध्ये सहा कर्मचारी गेले. ते

जिल्हा परिषदेतील प्रकार : वेळीच मदत मिळाल्याने सर्व सुरक्षित वर्धा : हस्तांतरित न झालेल्या आणि लिफ्ट वापरू नये, अशी सूचना नसलेल्या लिफ्टमध्ये सहा कर्मचारी गेले. ते तब्बल पाऊण तास लिफ्टमध्येच अडकले. यामुळे कर्मचाऱ्यांचे अवसान गळाले होते. मोबाईलवरून संपर्क झाल्यानंतर वेळीच मदत मिळाल्याने सर्व कर्मचारी सुखरूप बाहेर पडले. हा प्रकार सोमवारी जिल्हा परिषदेत घडला. जिल्हा परिषद इमारतीमध्ये लिफ्ट बसविण्यात आली आहे; पण ती अद्याप हस्तांतरित वा सुरू झालेली नाही. शिवाय तत्सम सूचना तेथे लावलेली नाही. यामुळे सोमवारी सामान्य प्रशासन विभागातील रमेश वानखेडे, अमोल राऊत, विशाल वानखेडे, अशोक कन्नाके, दीपक रोहाते, बबन नागरगोजे हे सहा कर्मचारी लिफ्टद्वारे तळमजल्यावरून वरच्या माळ्यावर गेले. दुपारी १.५० वाजता लिफ्टमध्ये गेलेले कर्मचारी तेथेच अडकून पडले. कर्मचाऱ्यांनी लिफ्टमधून बाहेर निघण्याचे प्रयत्न केले; पण त्यांना बाहेर निघता आले नाही. अखेर विशाल वानखेडे यांचा भ्रमणध्वनीवरून अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक संदीप विहिरकर यांच्याशी संपर्क झाला. यानंतर कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी धावपळ सुरू झाली. या कर्मचाऱ्यांना तब्बल पाऊण तास लिफ्टमध्येच राहावे लागले. २.३७ वाजता त्यांना बाहेर काढण्यात आले. यासाठी लिफ्टचा एक भाग सबलीच्या साह्याने वाकविण्यात आला. दरम्यान, हे कर्मचारी दुसऱ्या माळ्यावर गेले. तेथे विद्युत पुरवठा बंद झाला. कालांतराने विद्युत पुरवठा सुरू होताच लिफ्ट त्याच वेगाने आपोआप खाली आली. प्रवेशद्वार न उघडल्याने धावपळ उडाली. संबंधित कंत्राटदारही पोहोचले. त्यांनी चावीचा वापर करून लिफ्ट सुरू केली व कर्मचारी सुखरूप बाहेर पडले. सुरक्षित बाहेर पडल्याने कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला; पण दिवसभर याच घटनेची जिल्हा परिषदेमध्ये चर्चा होती.(कार्यालय प्रतिनिधी) प्रमाणपत्र, फलकाचा अभाव ४लिफ्ट सुरू करण्याकरिता मुंबई येथील संबंधित विभागाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे; पण अद्याप तसे प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. यामुळे लिफ्ट बंद असून रितसर लोकार्पणही करण्यात आले नाही; पण लिफ्टचा वापर करू नये, असा फलकही लावलेला नसल्याने कर्मचारी त्यात अडकले.