संस्कार आदिवासी आणि वीरांगणा महाराणी दुर्गावती बहुद्देशीय संस्थेचे आयोजनहिंगणघाट : संस्कार आदिवासी सामाजिक संस्था आणि वीरांगणा महाराणी दुर्गावती बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन पंचमुखी देवस्थान शहालंगडी येथे करण्यात आले होते. या सोहळ्यात सहा जोडपी विवाहबद्ध झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव सयाम तर उद्घाटक म्हणून गडचिरोलीचे खासदार अशोक नेते उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून आर्णी विधानसेभेचे आमदार राजु तोडसाम, पांढरकवड्याचे माजी नगराध्यक्ष भाऊराव मरापे, वासुदेव महाराज शहालंगडी, पंचायत समिती सदस्य दमडु मडावी, कवडू निखाडे, कृष्णा व्यापारी, अजय मडावी, लीलाधर मडावी आदींची उपस्थिती होती. आमदार अशोक नेते म्हणाले, आज शेतकरी व शेतमजुरांची स्थिती अतिशय भीषण आहे. अशा परिस्थितीत विवाह सोहळ्याचे अवडंबर न करता सामूहिक विवाह सोहळ्याचा सर्वांनी लाभ घेणे गरजेचे आहे. आमदार तोडसाम म्हणाले, युवकांनी आपल्या संस्कृतीला जपण्याची गरज आहे. आदिवासी समाज बांधवांनी स्पर्धेच्या युगात कठोर परिश्रम घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. संस्थेच्या वतीने विवाहित जोडप्यांना दिवान, कुलर, सुटकेस, कुकर, बादली, हॉटपॉट आदींसह संसारोपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. तसेच संस्कार आदिवासी सामाजिक संस्थेतर्फे अशोक नेते, राजु तोडसाम, कृष्णा व्यापारी या मान्यवरांसह समाजातील कार्यकर्ते व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक आडे यांनी केले तर संचालन रत्नमाला उईके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शंकर सोयाम, दिगांबर किन्नाके, अभिमान करपाते, अमोल मडावी, श्रीरंग उईके, अजय करपाते, रोशन कोडापे, योगेश मसराम, गजानन मडावी, सचिन मडावी, नुसाराम कुडमते, शंकर केराम, समीर मडावी, प्रशांत मसराम, परसराम मसराम, मोहन बैस, जनार्दन नैताम, राजू पिसे, अमोल नैताम, रोहित मांडवकर, भरत शिंंदे, सागर महाजन, साहिल भगत, अजय मंगेकर, भास्कर कुमरे, माला उईके, शुभांगी मडावी, कल्पना धोटे, चेतना बुरडकर, मनीषा फाले आदींनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)
विवाह सोहळ्यात सहा जोडपी विवाहबद्ध
By admin | Updated: June 5, 2016 01:56 IST