शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

सिताफळाने मला देशभर प्रसिद्धी मिळवून दिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:24 IST

रासायनिक खत न वापरता वर्षाकाठी ५० लाख रुपयांचे उत्पादन शेतीतून घेता येते, हे प्रगतशील शेतकºयाने सिद्ध केले. सिताफळ हे मुख्य पीक माणून शेती करणारे सुरेश पाटील सध्या देशभर प्रसिद्ध झालेत.

ठळक मुद्देसुरेश पाटील : नैसर्गिक शेतीच्या भरवशावर वार्षिक ५० लाख उत्पन्न

प्रशांत हेलोंडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रासायनिक खत न वापरता वर्षाकाठी ५० लाख रुपयांचे उत्पादन शेतीतून घेता येते, हे प्रगतशील शेतकºयाने सिद्ध केले. सिताफळ हे मुख्य पीक माणून शेती करणारे सुरेश पाटील सध्या देशभर प्रसिद्ध झालेत. सिताफळाने देशभर प्रसिद्धी मिळवून दिली, असे ते अभिमानाने सांगतात. डॉ. सुभाष पाळेकर यांच्या तंत्रानुसारच संपूर्ण शेती करीत असल्याचेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितलेनागपूर येथील सुरेश मनोहरराव पाटील यांची हळदगाव येथे ७० एकर शेती आहे. एकत्र कुटुंब असून नागपूर येथे वास्तव्यास आहे. १२ वर्षांपूर्वी त्यांनी १५ एकरात सिताफळाची बाग लावली. त्यांनी कुठल्या दुकानातून बियाणे वा रोप आणले नाही. सुमारे २० वर्षे संशोधन करून सिताफळाचे रोप त्यांनी भावाच्या साह्याने विकसित केले. सदर वाणाला त्यांनी ‘सरस्वती ७’ असे आईचे नाव दिले. या वाणाला हंगामानंतर म्हणजे साधारण सिताफळ अर्धेधिक निघाल्यानंतर फळ येतात. या झाडाला अर्ध्या ते एक किलो वजनाचे फळ येते. दिसायला सुंदर व चवीला हवेहवेसे, गोड हे सिताफळ पसंतीस उतरत आहे. संपूर्ण शेती जीवामृतावर आधारित नैसर्गिक पद्धतीने करीत असून कुठलेही विषाचे स्प्रे नाही.१५ एकरात लिंबू आहे. लिंबाची बेडवर लागवड केली. आवळा, चार एकरात क्रिकेट बॉल चिकू, दीड एकरात लखनऊ ४९ पांढरा व ललित हा लाल पेरू, अडीच एकरात डाळींब व काही भागात तुरी आहे. संपूर्ण शेती नैसर्गिक पद्धतीने करीत असून वखर, नांगरण करीत नाही. आजपर्यंत शेतात ट्रॅक्टरची गरज पडली नाही.सिताफळाची मार्केटींग सुरेश पाटील स्वत: करतात. गिफ्ट बॉक्स म्हणून जातात. नागपूरच्या प्रत्येक प्रदर्शनात स्टॉल लावला जातो. यापूर्वी सिताफळ दुबई येथे एक्स्पोर्ट केले; पण त्यात आपले नावही येत नाही. यामुळे एक्स्पोर्ट करणे बंद केले आहे. नागपूरमध्येच सिताफळांचा ‘शॉर्टेज’ असतो. अर्धा किलो वजनाच्या सिताफळांचा दोन किलोचा बॉक्स ४०० रुपयांना विकतो तर एक किलो वजनाची सिताफळे त्यापेक्षा महाग खपतात. कुठल्याही स्थितीत भाव कमी करीत नाही. नितीन गडकरी यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी व अन्य केंद्रीय मंत्र्यांनाही सिताफळ खाऊ घातले आहे. शेतात नर्सरी असून सर्व रोपे तेथे तयार होता. तायवान पपई, सिताफळ, पेरू, चिकूची रोपे आहेत. या ७० एकर शेतीतून वर्षाकाठी ५० लाख रुपयांचे उत्पन्न होते.गरज पडल्यास नैसर्गिक अर्काची फवारणीगरज पडल्यास निमास्त्र व दशपर्णी अर्क यांची फवारणी करतो. निमास्त्रामध्ये १० किलो कडुनिंबाचा पाला, ५ लिटर गोमुत्र, अर्धा किलो शेण व पाणी हे तीन दिवस प्लास्टिक ड्रममध्ये ठेवून नंतर फवारणी करता येते. दशपर्णी अर्कामध्ये सिताफळ, येरंडी, निरगुडी, करंजी, बेल, काळी तुळस, रूई, झेंडू, धोत्रा व बेशरमची प्रत्येकी दोन किलो पाने, काड्या बारिक करायच्या. यात २० लिटर गोमुत्र, एक किलो तिखट, २५० ग्रॅम हळद, अर्धा किलो अद्रक व लसन २०० लिटर पाण्यात प्लास्टिक ड्रममध्ये ४० दिवस सडवायचे. यानंतर ते गाळून ३ लिटर प्रत्येकी १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची.आंतरपीक पद्धतीने केली शेतीसिताफळ, पेरू, चिकू या बागांमध्ये शेवगा आंतरपीक घेतले. शेवग्यामुळे झाडांना विरळ सावली मिळते. शेवगा ‘नायट्रोजनचे फिक्सेशन’ करते. आपल्याकडे उन्हाळ्यात प्रखर उन्ह असते. शेवग्यामुळे उन्हावर नियंत्रण ठेवता येते.किचन पद्धतप्रत्येक झाडाला त्याचं किचन पाहिजे. यासाठी चिकूमध्ये दोन झाडांच्या मध्ये ८ फुट लांब, ४ फुट रूंद व दीड फुट खोल तर पेरूमध्ये १० बाय ६ फुट खड्डा केला आहे. तो कचºयाने भरला. यात गांडुळ निर्माण होऊन झाडांना लागणारे ह्युमस तयार होते.शेतीत तीन पद्धतीचा वापरसिताफळ बागेला नैसर्गिक द्रावण दिले जाते. यात १० किलो गावराण गाईचे शेण, ५ ते १० किलो गोमुत्र, प्रत्येकी एक किलो गुळ, बेसन, धुºयावरील मुठभर माती हे २०० लिटर पाण्यात प्लास्टिक ड्रममध्ये टाकायचे. ड्रम सावलीत सकाळ-सायंकाळ क्लॉकवाईज ठेवावे. तीन दिवसांनंतर ते वापरता येते. जमिनीवर टाकायचे झाल्यास प्रत्येक झाडाला एक डबा तर फवारणी ५ ते १० लिटर गाळून करता येते.आच्छादन पद्धतीत शेतातील काडीकचरा कधीही काढला वा जाळला नाही. तो जमिनीवर ठेवला. त्याखाली गांडूळ वाढून ते जमीन सुपिक बवनितात. कचºयाचे आच्छादन हे गांडुळांचे घर ठरते. जमिनीत १२ फुटांपर्यंत गांडुळ असतात. त्यांनी खाल्लेल्या मातीमध्ये नत्र, स्पूरद, पलाश मुबलक असते. गांडुळांमुळे जमीन भुसभुशीत होऊन पाणी मुरते. वॉटर लेव्हल वाढते. शेताला वनभिंत केली आहे. यात तीन ‘स्टेज’मध्ये उतरत्या क्रमाने झाडे लावली. यामुळे वादळ थेट शेतात शिरत नाही. परिणामी, शेतात निर्माण होणारे कार्डबडाय आॅक्साईड झाडाला मिळते.