शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

साहेब...! दिवाळी आली अन् गेली; आम्हा भटकंती करणाऱ्या जमातीसाठी रोजचाच शिमगा, रोजचीच दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 05:00 IST

आर्वीतील तळेगाव मार्गावर रस्त्याच्या कडेला सात कुठुंब पाल ठाकून राहत आहे. त्यांच्या परिवारात ४० सदस्य असून पोट भरण्याकरिता गावोगावी जाऊन ते आयुर्वेदिक अैाषधी विकण्याचे काम करतात. त्यांच्या परिवारात जवळपास ११ लहान मुलं असून या कोरोनायनात साऱ्यांचेच  दिवाळे निघाल्याने त्याचा परिणाम दिवाळीच्या उत्साहावर पडला. या भटक्या जमातीच्या लाेकांनीही दिवाळीचा आनंद घेता आला नाही.

ठळक मुद्देरस्त्यालगतच्या झोपडीत पेटविली पणती ; फाटक्या कापडांवरच बच्चेकंपनींचा निरागस उत्साह

 लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/ आर्वी : भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळी सणाला विशेष महत्व आहे. हा सण प्रकाशपर्व म्हणून श्रीमंतापासून तर सर्व सामान्यांपर्यंत सारेच आपापल्या परीने साजरे करतात. मात्र, रस्याच्या कडेला पाल ठाकून राहणाऱ्या भटक्या जमातीतील लोकांच्या झोपडीत दिवाही पेटला नाही. एकाच पणतीच्या प्रकाशात दिवाळी साजरी करणाऱ्या या भटक्या कुटुंबानी ‘साहेब...! आमच्याकरिता रोजचाच शिमगा अन् रोजचीच दिवाळी’, अशी अगतिकता लोकमतशी बोलताना व्यक्त केली.आर्वीतील तळेगाव मार्गावर रस्त्याच्या कडेला सात कुठुंब पाल ठाकून राहत आहे. त्यांच्या परिवारात ४० सदस्य असून पोट भरण्याकरिता गावोगावी जाऊन ते आयुर्वेदिक अैाषधी विकण्याचे काम करतात. त्यांच्या परिवारात जवळपास ११ लहान मुलं असून या कोरोनायनात साऱ्यांचेच  दिवाळे निघाल्याने त्याचा परिणाम दिवाळीच्या उत्साहावर पडला. या भटक्या जमातीच्या लाेकांनीही दिवाळीचा आनंद घेता आला नाही.

दिवाळी काय खरेदी केले?दिवाळी कधी आली अन् कधी गेली आम्हाला कळलेही नाही. त्या दिवशी आमच्या पालात पणती लावली आणि देवीची पूजा केली. पण, आम्हा लाेकांवर देवी कधी प्रसन्न होईल हे देव जाणे. येथे खायचेचे वांधे झाले आहे तेथे दिवाळीची खरेदी कुठून करणार, अशी व्यथा मांडली.

मुलांनी कसा लुटला आनंदइतरत्र फुटणारे फटाके आणि मोठ- मोठ्या घरांवर केलेली रोषणाई बघितली. जुन्याच कपड्यावर राहून घरात बणविलेले अन्न घाऊन दिवाळीचा सण साजरा केला. दिवाळीकरिता कुठे हात पसरला पण, देणाऱ्यांचे हातही कमी पडलेत.

कोरोनामुळे काही कायम परिणाम झाला लॅाकडाऊनमुळे आठ महिन्यांपासून हाताला काम नाही. दारोदारी भटकून उदरनिर्वाह करणाऱ्यांची परिस्थिती तर फारच विदारक आहे. कुणी उधारीवर पैसे द्यायला तयार नव्हते तर कुणी खायला देण्यास तयार होत नव्हते. गावाबाहेर जाणेही शक्य नसल्याने मिळतच पूर्णत: बंद झाली, असे विरु वैद्य धुर्वे यांनी सांगितले.झोपडीतील मुलांना काय वाटते...दिवाळीच्या दिवशी दररोज सारखचं खेळलो. सायंकाळी समोरच्या घरांवर दिसणारी रोषणाई आणि आकाशात उडणारे फटाके बघत होतो. आईने पालात जे काही शिजविले ते खाल्लं आणि झोपी गेलो. गोडधोडचा तर पत्ताच नाही. दिवाळीत नवीन कपडे आम्हाला कधीही नशिबी आले नाही, असे पालावरील खनको धुर्वे याने सांगितले.

 

टॅग्स :Diwaliदिवाळी