शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

रेशीम शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 22:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील नैसर्गिक परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती साधण्यासाठी रेशीम शेती प्रमुख पर्याय ठरू शकते. शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती बरोबरच रेशीम शेतीची जोड दिल्यास त्यांना गावातच रोजगार निर्मिती करता येते. शिवाय रेशीम कोष उत्पादन करून दरमहा उत्पन्न घेता येते. जिल्ह्यात सुमारे ६०० एकरवर तुतीची लागवड करण्यात आली ...

ठळक मुद्देशैलेश नवाल : जिल्ह्यात ६०० एकरवर तुतीची लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील नैसर्गिक परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती साधण्यासाठी रेशीम शेती प्रमुख पर्याय ठरू शकते. शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती बरोबरच रेशीम शेतीची जोड दिल्यास त्यांना गावातच रोजगार निर्मिती करता येते. शिवाय रेशीम कोष उत्पादन करून दरमहा उत्पन्न घेता येते. जिल्ह्यात सुमारे ६०० एकरवर तुतीची लागवड करण्यात आली आहे. तुती लागवडीपासून गावातच रोजगार निर्मिती होईल. यामुळे शेतकºयांनी रेशीम शेती करावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.रेशीम धागा निर्मिती प्रकल्पाची माहिती जाणून घेतल्यानंतर ते मार्गदर्शन करताना बोलत होते. शासनाकडून एक एकर तुती लागवड व कीटक संगोपनागृहाचे बांधकामासाठी मनरेगांतर्गत तीन वर्षाकरिता कुशल व अकुशल कामांसाठी प्रती लाभार्थ्याला प्रत्येक एकरासाठी २ लाख ९२ हजार ४६५ रूपये मजुरी स्वरूपात अनुदान देण्यात येते. शिवाय कोषापासून मिळणारे उत्पन्न वेगळे मिळते. त्यामुळे शेतकºयांना रेशीम शेतीपासून रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात तुती लागवड करून आपले स्त्रोत वाढवावे. यासाठी जिल्ह्यात ६०० एकर वर तुती लागवडीची नोंदणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा रोजंदारीवरील होणारा खर्च शासन करीत आहे. तसेच पारंपारिक पिकापेक्षा कमी खर्च, कमी मेहनत व जास्त उत्पन्न मिळत असल्यामुळे शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात तुती लागवड करावी, असे आवाहन नवाल यांनी केले.