शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठांची मूक चिंतनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 22:21 IST

जिल्हा भूविकास बँक सेवानिवृत्त कर्मचाºयांनी हक्काच्या मागण्यांसाठी सेवाग्राम ते वर्धा मूक चिंतनयात्रा काढली. या माध्यमातून निवासी उपजिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देहक्काच्या मागणीसाठी आंदोलन : जिल्हाधिकाºयांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : जिल्हा भूविकास बँक सेवानिवृत्त कर्मचाºयांनी हक्काच्या मागण्यांसाठी सेवाग्राम ते वर्धा मूक चिंतनयात्रा काढली. या माध्यमातून निवासी उपजिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.महात्मा गांधी आश्रमसमोर जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक सेवानिवृत्त कर्मचारी कृती समितीने ११ आॅक्टोबरपासून बैठा बेमुदत सत्याग्रह सुरू केला आहे. सत्याग्रहाला १० नोव्हेंबर रोजी एक महिन्याचा कालावधी झाला; पण शासनाला अद्याप दखल घ्यावीशी वाटली नाही. सेवानिवृत्तांची आर्थिक हक्काची मागणी शासनाकडे प्रलंबित असून वेतनाविना निवृत्तांना जगणे असह्य झाले आहे. कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक व आरोग्याचे प्रश्न गंभीर झाले आहे. पाल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आ वासून समोर असल्याने बैठा सत्याग्रह सुरू केला. सत्याग्रह स्थळी शेख हाशम, ठोसर, संदीप भांडवलकर यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर विविध मागण्यांचे फलक घेत स्त्री, पुरुष, मुली, मुले मूक चिंतनयोत्रेत सहभागी झाले. म. गांधी व डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण केल्यानंतर मुलींनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री सुभाष देशमुख, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन दिले. याप्रसंगी निधी भांडेकर, स्वानंदी वागळ, ऐश्वर्या राहाटे, वैरागडे, कुत्तरमारे यांनी चर्चा केली.बँकेची मालमत्ता ताब्यात घेत कर्मचाºयांची देणी द्यावीराज्यातील जिल्हा भूविकास बँक व शिखर बँकेच्या मालकीची मोक्याच्या ठिकाणी स्थावर मालमत्ता आहे. या मालमत्तेची रेडी रेकनर व्हॅल्यू ५५० कोटी तर बाजार किंमत २ हजार कोटींवर आहे. ती मालमत्ता ताब्यात घेत कर्मचाºयांची ३०० कोटींची देणी त्वरित देण्यात यावी. यातूनच ज्येष्ठांच्या मागण्यांचा प्रश्न सुटू शकतो, असे समितीने निवेदनात नमूद केले आहे.यात्रेत सुरेश रहाटे, सचिन काळे, अशोक वैरागडे, मधुकर सोरते, सागर कुत्तरमारे, हरिदास वानखेडे, अशोक मगर, देवीदास राखुंडे, रत्नाकर गुजर, लक्ष्मण खडसे, पुष्पा मानकीकर, सत्यवती शेर, धनश्री भांडेकर, शोभा खडसे, नेहा कुत्तरमारे यांच्यासह मोठ्या संख्येने विदर्भातील सेवानिवृत्त सहभागी झाले होते.