शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या संकेताने बळीराजाची लगबग

By admin | Updated: May 30, 2017 01:03 IST

रोहिणी नक्षत्र लागताच पावसाचे संकेत मिळाले आहे. यामुळे बळीराजा आता शेतीच्या कामात व्यस्त झाल्याचे चित्र दिसून आले आहे.

रोहिणी नक्षत्रात पावसाच्या सरी : बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव सुरू लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : रोहिणी नक्षत्र लागताच पावसाचे संकेत मिळाले आहे. यामुळे बळीराजा आता शेतीच्या कामात व्यस्त झाल्याचे चित्र दिसून आले आहे. उन्हाळवाहीची कामे पूर्ण करून पेरणीकरिता सारे फाडणे, शेताला कुंपण करणे आदि कामांसह बाजारात बियाण्यांकरिता गर्दी होणे सुरू झाले आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरीपात एकूण ४ लाख १८ हजार ५०० हेक्टरवर पेरणी होणार असल्याचा आराखडा कृषी विभागाच्यावतीने तयार करण्यात आला आहे. यात २ लाख २२ हजार हेक्टरवर कपाशी तर १ लाख ९ हजार २५० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होणार असल्याचे संकेत कृषी विभागाच्या आराखड्यात आहेत. तर तुरीचा पेरा ७७ हजार ७०० हेक्टरवर होणार असल्याचे आराखड्यात म्हटले आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरीपात कपाशीचा पेरा वाढणार असून नियोजित क्षेत्राकरिता संकरित कपाशीची ४ हजार ४४० क्विंटल बियाणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. तर सोयाबीची ५३ हजार २६० क्विंटल बियाणे गरजेचे आहे. तर यंदा बाजाराऐवजी इतरत्र भाव खाणाऱ्या तुरीची ४ हजार २०० क्विंटल बियाण्यांची मागणी आहे. जिल्ह्यात गरजेच्या तुलनेत मुबलक बियाणे असून शेतकऱ्यांना भटकंती करावी लागणार नसल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी केवळ बियाणे खरेदी करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला त्यांच्यावतीने देण्यात आला आहे. बियाण्यांसह खतांचीही मागणी होणार असून कृषी विभागाच्यावतीने त्याची मागणी पूर्वीच करून ठेवली आहे. जिल्ह्याला यंदाच्या हंगामात सरळ, संयुक्त आणि मिश्र खते असे एकूण १ लाख २८ हजार २०० क्विंटल खताची गरज आहे. यापेक्षा अधिक खत जिल्ह्यात उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. यात गत हंगामातील काही शिल्लक खताचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. यंदाच्या हंगामाकरिता कृषी विभागाची तयारी पूर्ण झाली असून पावसाचे संकेत मिळत असल्याने शेतकरीही कामाला लागला आहे. रोहिणी नक्षत्र लागताच आकाशात ढग दाटणे सुरू झाले. ढग दाटताच सर्वत्र बळीराजाने शेतीच्या कामांना वेग दिला आहे. शेती कामामुळे ग्रामीण भागात लगबग सुरू झाली आहे. यंदा मान्सूनपूर्व पेरणीला पाठ पावसाळा सुरू होण्यापूर्वी बऱ्याच शेतकऱ्यांकडून मान्सूनपूर्व पेरणी केल्या जात होती. यंदा मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या पेरणीला बगल दिल्याचे दिसून आले आहे. ओलिताची सोय असतानाही केवळ कायम असलेल्या तापमानामुळे शेतकऱ्यांनी याला पाठ दिल्याचे बोलले जात आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी तयारी पूर्ण झाली असून जोमदार पावसाची प्रतीक्षा आहे. कर्जमाफीच्या प्रतीक्षेत हातबट्ट्याचे व्यवहार शासनाकडून कर्जमाफी मिळेल या आशेत बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्जाचे हप्ते भरले नाही. यामुळे त्यांना नवे कर्ज मिळण्याची आशा मावळली आहे. यामुळे शेतीची कामे हातबट्ट्याच्या व्यवहारावर सुरू आहे. परिणामी बळीराजा पुन्हा सावकाराच्या दारी जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.