लोकमत न्यूज नेटवर्कनाचणगाव : येथील आर.के. कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी शुभम भिमटे याची महाराष्ट्राच्या कबड्डी संघात निवड झाली आहे. बिड जिल्ह्यातील आष्टी येथे पार पडलेल्या १९ वर्षीय राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत नागपूर विभागातून शुभम भिमटे याने उत्कृष्ट कामगिरी बजावली. याचेच फलित म्हणून त्याची महाराष्ट्र संघात स्थान पक्के झाले आहे. ग्रामीण भागातील या मातीतील खेळाडूने राज्य पातळीवर स्थान पटकाविल्याने सर्वच स्तरातून त्याचे कौतुक होत आहे. नगर स्पोर्टीग क्लबच्या माध्यमातून त्याने सराव केला. त्याने या यशाचे श्रेय आर.के. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य नूरसिंग जाधव, नगर स्पोर्टीग क्लबचे धीरज देशमुख, बालू महाजन, आंतरराष्ट्रीय पंच पद्माकर देशमुख यांच्यासह आई- वडीलांना दिले.
शुभम भिमटेची महाराष्ट्र कबड्डी संघात निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 21:13 IST