कार्यवाही : शासकीय कामात हयगयीचा ठपकावर्धा : देवळी ऩप़ च्या विषय समिती निवडणूक कामासाठी नियुक्ती केली असताना उपजिल्हाधिकारी शिरीष पांडे पोहोचले नाही़ यामुळे त्यांना कारणे दाखवा तर शासकीय कामात हयगय केली म्हणून लिपीक टंकलेखक प्रमोद लताळ यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली़ याबाबत जिल्हाधिकारी एऩ नवीन सोना यांनी आदेश जारी केला आहे़ देवळी ऩप़ स्थायी समितीच्या निवडणुकीसाठी अध्यासी, पीठासीन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (भूसंपादन सामान्य) शिरीष पांडे यांची नियुक्ती केली होती़ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेश क्ऱ अका/नपाप्र /कावि ६९५/२०१४, दि. १५ डिसेंबर २०१४ अन्वये ही नियुक्ती होती़ आदेशाची प्रत त्यांच्याकडे १८ डिसेंबर रोजी पाठविली़ यानुसार २३ डिसेंबर रोजी निवडणूक घेण्याकरिता त्यांनी उपस्थित राहणे गरजेचे होते; पण ते गैरहजर राहिलेत़ यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आला आहे़(कार्यालय प्रतिनिधी)
उपजिल्हाधिकाऱ्यांना कारणे दाखवा
By admin | Updated: January 13, 2015 23:03 IST