शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

रूंदीकरणात आर्वी नाका चौकात वळण देऊ नये!

By admin | Updated: January 23, 2017 00:50 IST

धुनिवाले चौक ते आर्वी नाका चौकापर्यंत रस्ता रूंदीकरण आणि सौंदर्यीकरणाचे काम मागील काही दिवसांपासून करण्यात येत आहे.

‘युवा परिवर्तन की आवाज’चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे वर्धा : धुनिवाले चौक ते आर्वी नाका चौकापर्यंत रस्ता रूंदीकरण आणि सौंदर्यीकरणाचे काम मागील काही दिवसांपासून करण्यात येत आहे. या रस्त्याला आर्वी नाका चौकात वळण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. येथे रस्त्याला वळण दिल्यास अपघाताची संख्या वाढण्याची शक्यता बळावली आहे. यामुळे युवा परिवर्तन की आवाज संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. यात वळण न देण्याची मागणी करण्यात आली आहे. बॅचलर रोडवरील अतिक्रमण काढण्यासोबतच या मार्गाला आर्वी नाका चौक येथे वळण न देता थेट बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी संघटनेच्यावतीने निवेदनातून करण्यात आली आहे. रस्ता रूंदीकरण आणि सौंदर्यीकरण करण्यात अनेक पक्क्या बांधकामाचे अडथळे आहेत. आर्वी नाका चौक परिसरात वसंत प्राथमिक शाळेशेजारी अनेकांनी अतिक्रमण केलेले आहे. काही मंडळी राजकीय वलयात वावरणारी असून त्यांनी केलेले अतिक्रमण वाचविण्याच्या प्रयत्न होत आहेत. हे अतिक्रमण पाठीशी घालण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग या मार्गाला वळण देण्याचा बेत आखत आहे. असा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे. आर्वी नाका परिसरातील अतिक्रमण काढण्यात यावे, यात कोणताही मतभेद करण्यात येऊ नये. याशिवाय रस्ता रूंदीकरणाकरिता मार्गालगतच्या दीडशेवर वृक्षांची कत्तल करण्यात येत आहे. रस्ता बांधकाम करताना वृक्षांची कत्तल टाळावी. रस्त्याचे बांधकाम झाल्यावर सौंदर्यीकरणात भर घालण्याकरिता अधिकाधिक वृक्ष लागवड करण्यात यावी, आदी मागण्या संघटनेने निवेदनातून केल्या आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असून कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे. शिष्टमंडळात निहाल पांडे, गौरव वानखेडे, पलाश उमाटे, सौरभ माकोडे, ऋषिकेश सरोदे, हेमंत भोसले, समीर गिरी, ऋषिकेश बुटले, राहुल मिश्रा, आशुतोष परटक्के, कुणाल ताल्हण तसेच संघटनेच्या सदस्यांचा समावेश होता.(स्थानिक प्रतिनिधी)