शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

तूर उत्पादकांना फटका

By admin | Updated: August 22, 2016 00:39 IST

जिल्ह्यात नऊ हजारापेक्षा जास्त भाव असलेल्या तुरीचे दर शनिवारी पाच ते सहा हजाराने पडले.

शेतकरी चिंतातूर : एका महिन्यात चार हजारांची घसरणवर्धा : जिल्ह्यात नऊ हजारापेक्षा जास्त भाव असलेल्या तुरीचे दर शनिवारी पाच ते सहा हजाराने पडले. यामुळे दरवाढीच्या आशेत असलेल्या शेतकऱ्यांना या एका महिन्यात सरासरी चार हजार रुपयांची फटका बसल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील बाजार समितीत देत असलेले दर पडल्याने शेतकऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली. यामुळे दरवाढीच्या आशेत असलेल्या शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. तुरीचे भाव गत वर्षी प्रमाणे यंदाही पावसाळ्यात वाढतील या अपेक्षेने बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या तुरी न विकता घरी साठवून ठेवल्या होत्या. अशा शेतकऱ्यांना यामुळे चांगलाच फटका बसला आहे. जुलै महिन्याच्या प्रारंभी तुरीचे भाव प्रति क्विंटल नऊ हजारावर होते. तुरीचे भाव दहा हजार होईल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी तुरी घरी साठवून ठेवल्या. जुलैच्या १५ तारखेपासून तुरीचे भाव पडणे सुरू झाले. एक महिन्याच्या कालावधीत तुरीचे भाव चार हजाराने कमी होवून आता ते सहा हजाराने खाली आले आहे. एका महिन्यात भावात झालेल्या या घसरणीमुळे तूर उत्पादकांना आर्थिक फटका बसला आहे. तुरीचे बाजारभाव दररोज खाली येत आहे. ते येत्या दिवसात कधीतरी वाढतील या आशेने ज्या शेतकऱ्यांनी तुरी घरी ठेवल्या त्यांची चिंता वाढली आहे. बाजारात कोणत्याच वस्तूचे भाव अस्थिर राहत नाही. याला अपवाद फक्त शेतकऱ्यांचा माल ठरतो. ही शेतकऱ्यांची शोकांतिका आहे. तूर डाळीचे भाव वधारताच समाजातील सर्व घटक ओरड करतात. आता शेतकऱ्यांचे एवढे मोठे नुकसान होत असताना कोणीच आवाज काढत नाही. वास्तविकता बाजारात आजही उत्तम तूर डाळ १२० ते १३० रुपये किलो आहे.शासनाने स्वस्त धान्य दुकानात उपलब्ध करून दिलेली डाळ ९५ रुपये किलो असली तरी तिचा दर्जा निकृष्ठ असल्याची ओरड आहे. विदर्भातील स्वस्त धान्य दुकानातून १०३ रुपये किलोप्रमाणे वितरीत होणारी तूर डाळ अत्यंत निकृष्ठ प्रतीची असल्याने स्वस्त धान्य दुकानदार तिची उचल करण्यास उत्सूक नसल्याची चर्चा बाजारात आहे.(प्रतिनिधी)