शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीनंतर पुन्हा रोकड तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:04 IST

नोटाबंदीच्या आदेशानंतर जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोकड तुटवड्याच्या समस्येला सामोरे जावे लागले होते. त्या घटनेनंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा रोकड तुटवडा सध्या निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देकॅशलेस एटीएमने वाढविली डोकेदुखी : बहुतांश एटीएमवर ‘नो-कॅश’चे फलक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नोटाबंदीच्या आदेशानंतर जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोकड तुटवड्याच्या समस्येला सामोरे जावे लागले होते. त्या घटनेनंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा रोकड तुटवडा सध्या निर्माण झाला आहे. त्यातच जिल्ह्यातील एकूण १७६ एटीएम पैकी सुमारे ८० टक्के एटीएम समोर नो-कॅशचे फलक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात विविध राष्ट्रीयकृत व खासगी बँकांचे असे एकूण १७६ एटीएम कक्ष आहेत. त्यापैकी बहूतांश एटीएम कक्षात रोकड टाकण्याची जबाबदारी बँकांनी खासगी कंपन्यांना दिली आहे. जिल्ह्यातील नागरिकांचे सर्व आर्थिक व्यवहार सुरळीत व्हावे यासाठी प्रत्येक दिवशी सुमारे सहा कोटी रोकडची गरज असते. परंतु, सध्यास्थितीत प्रत्येक पंधरा दिवसांच्या कालावधीत केवळ १ कोटींची रोकडच जिल्ह्याला प्राप्त होत असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील नागरिकांकडून विविध आर्थिक व्यवहार करण्यासाठी होत असलेली रोकडची मागणी व त्याच्या तुलनेत रिझर्व बँकेकडून नाममात्र होणारा रोकड पुरवठा यामुळे अनेक एटीएम सध्या कॅशलेस असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी शहराचा फेरफटका मारला असता बहूतांश एटीएम समोर नो-कॅशचा फलक कायम असल्याचे दिसून आले. रोकड काढणाऱ्यांना कॅश असलेल्या एटीएमचा शोध घेण्यासाठी भटकंतीच करावी लागत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. ज्या एटीएम मध्ये रोकड आहे तेथे रोकड काढणाºयांनी एकच गर्दी केल्याचे दिसून येत आहे. एकूणच कॅशलेस एटीएमने सर्वसामान्य नागरिकांची डोकेदुखीच वाढविल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.२००० च्या नोटांचा तुटवडाकेंद्र सरकारकडून नव्याने संसदेत आणण्यात येणारे विधेयक व नुकत्याच उघडकीस आलेल्या पीएनबी बँक घोटाळ्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच जिल्ह्यातील अनेक एटीएममधून पूर्वी प्रमाणे दोन हजाराचे चलन निघत नसल्याचे दिसते. काहींनी दोन हजारांचे चलन आपल्याकडे साठवून ठेवल्याने दोन हजारांच्या नोटांचा तुटवडा जिल्ह्यात जाणवत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.आॅनलाईन व डिजिटलकडे पाठडिजिटल इंडिया या उपक्रमाच्या माध्यमातून सर्व आर्थिक व्यवहार प्रत्येकाने आॅनलाईन पद्धतीने करण्याच्या कामाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे. परंतु, जिल्ह्यात सध्यास्थितीत नागरिकांकडून आॅन लाईन पद्धतीने व डिजिटल पद्धतीने व्यवहार करण्याकडे पाठ दाखविल्या जात आहे. त्यामुळे रोकडच्या मागणीत वाढ होऊन रोकड तुटवडा निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. ही परिस्थिती अशीच आणखी पंधरा दिवस कायम राहणार असल्याचे बोलले जात आहे.गरज सहा कोटींची; पण प्राप्त होतात केवळ एक कोटीनागरिकांनी डिजिटल पद्धतीचा अवलंब करीत आपले आर्थिक व्यवहार केल्यास प्रत्येक दिवशी १ कोटी रोकड असल्यास रोकड तुटवडा जाणवणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पूर्वी दररोज ६ कोेटी रोकड जिल्ह्याला प्राप्त होत होती. परंतु, आता चौदा दिवसांच्या कालावधी लोटल्यानंतर केवळ १ कोटी इतकीतच रक्कम प्राप्त होत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.